IMPIMP

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरुन मविआ आणि शिंदे सरकारमध्ये राडा, वाद पोहोचला उच्च न्यायालयात

by nagesh
Governor Appointed MLA | petition has been filed in high court on the list of mlas appointed by the governor

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Governor Appointed MLA | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government)
आल्यानंतर ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतलेले निर्णय बदलण्यात आले तर काही रद्द करण्यात आले. यानंतर मविआ सरकारने
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी (Governor Appointed MLA) राज्यपालांना दिली होती. दरम्यान, राज्यात शिंदे सरकार
आल्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरुन ठाकरे सरकारने पाठवलेली यादी रद्द केली. यावरुन वाद निर्माण झाला आहे. आता हाच वाद मुंबई
उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहोचला आहे. याप्रकरणी याचिका दाखल (Petition Filed) करण्यात आली असून राज्यपालांचा निर्णय
संशयास्पद असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणावर लवकरच सुनावणी होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) पाठवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) रद्द करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Legislative Council) बारा आमदारांच्या नियुक्त जागेच्या यादीचा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. अॅड. नितीन सातपुते (Adv. Nitin Satpute) यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

 

मागील सरकारने दिलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी रद्द केल्या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार बाबतचे निर्णय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अद्यापही प्रलंबित असताना राज्यपालांनी शिंदे सरकारच्या म्हणण्यावरुन ठाकरे सरकारची यादी कशी रद्द केली? असा सवाल याचिकेतून करण्यात आला आहे.

 

राज्यापालांच्या या भूमिकेमुळे लोकप्रिय गायक आनंद शिंदे (Singer Anand Shinde), अनिरुद्ध वनकर (Anirudh Vankar), अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Actress Urmila Matondkar) यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले आहे.
या यादीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांचेही नाव होते.
परंतु, विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत (Legislative Council Elections)
त्यांचा विजय झाल्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहिली आहे.

 

ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता (Governor Appointed MLA) दिली नव्हती.
मात्र, शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची
यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरुन राज्यपालांनी यादी रद्द केल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारला
नवीन 12 सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Governor Appointed MLA | petition has been filed in high court on the list of mlas appointed by the governor

 

हे देखील वाचा :

Yashoda Teaser | प्रेग्नंट झाली समंथा रुथ प्रभु ! ‘यशोदा’ बनून आपल्या बाळाला वाचवण्यासाठी लढतेय

Mukhya Mantri Kisan Yojana | PM Kisan योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार; एकनाथ शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’

Bedu Health Benefits | अरोग्याचा खजिना आहे PM Modi यांचे हे आवडते जंगली फळ, कोलेस्ट्रॉल-कॅन्सर सारख्या 5 घातक आजारांवर देशी उपाय

 

Related Posts