IMPIMP

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा; मंडळाच्या वतीने उपक्रमांची रेलचेल

by nagesh
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | The arrival of Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Bappa 2022

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात, सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद आणि पारंपरिक रथ अशा उत्साही व मंगलमय वातावरणात हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे आगमन झाले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मंडळाचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन (Punit Balan), मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे (Sanjeev Javale), जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan), भाजप संघटक सरचिटणीस राजेश पांडे (Rajesh Pandey), संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) आदी मान्यवरसह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते, गणेशभक्त उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटीलम्हणाले, १८९२ पासूनची जुनी परंपरा असणारा, भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना आनंद होत आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात भाऊसाहेब रंगारी मंडळाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

 

 

दरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजता बाप्पांची मिरवणूक मंडपातून सुरू होऊन श्री तांबडी जोगेश्वरी चौक,
अप्पा बळवंत चौक मार्गे सकाळ कार्यालय मार्गे पुन्हा मंडपात आली.
या मिरवणुकीतील रथाचे सारथ्य मंत्री पाटील यांच्यासह बालन दाम्पत्याने केले. यावेळी श्रीराम, कलावंत, चेतक,
वाद्यवृंद, अभेद्य, समर्थ, जगदंब या ढोलताशा पथकांबरोबरच नगारा, सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात,
रथातून पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या मिरवणुक काढत श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

 

Web Title :- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | The arrival of Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Bappa 2022

 

हे देखील वाचा :

e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू

Narayan Rane | ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार’

Adani Group | NDTV मध्ये अतिरिक्त 26 टक्के भागीदारीसाठी 17 ऑक्टोबरला ओपन ऑफर आणणार अदानी ग्रुप

 

 

Related Posts