IMPIMP

Adani Group | NDTV मध्ये अतिरिक्त 26 टक्के भागीदारीसाठी 17 ऑक्टोबरला ओपन ऑफर आणणार अदानी ग्रुप

by nagesh
Adani Group | adani group to launch open offer for acquiring additional 26 per cent stake in ndtv on 17 october

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अदानी ग्रुप (Adani Group) 17 ऑक्टोबर रोजी NDTV मधील अतिरिक्त 26 टक्के भागीदारीसाठी ओपन ऑफर आणणार आहे. या ओपन ऑफरद्वारे 1.67 कोटी शेअर्स खरेदी करण्याची तयारी आहे. यासाठी शेअरची किंमत 294 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ऑफर व्यवस्थापित करण्याची संपूर्ण जबाबदारी जेएम फायनान्शिअलवर सोपवण्यात आली आहे. (Adani Group)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, जेएम फायनान्शियलने दिलेल्या जाहिरातीमध्ये ओपन ऑफर 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ती 1 नोव्हेंबरला बंद होऊ शकते. जर ही ओपन ऑफर पूर्णपणे 294 रुपये प्रति शेअरने सबस्क्राइब झाली तर ओपन ऑफरचे मूल्य 492.81 कोटी रुपये होईल.

 

कन्व्हर्टेबल डिबेंचर्स इक्विटीमध्ये बदलून घेतली 29.18% भागीदारी
अदानी ग्रुपने विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) मार्फत अप्रत्यक्षपणे 23 ऑगस्ट रोजी एनडीटीव्हीमधील 29.18% हिस्सा विकत घेतला होता. VCPL कडे RRPR Holding चे 99.99% कन्व्हर्टेबल डिबेंचर होते, जे व्हीसीपीएलने इक्विटीमध्ये रूपांतरित केले आणि भागीदारी घेतली. (Adani Group)

 

यानंतर, अदानी समूहाच्या कंपन्या, ज्यामध्ये विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL), AMG मीडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्रायझेसचा समावेश आहे. आता एनडीटीव्हीमध्ये अतिरिक्त 26 टक्के भागीदारी म्हणजेच 167 दशलक्ष इक्विटी शेअर्ससाठी ओपन ऑफर आणत आहे. ओपन ऑफरची घोषणा होताच एनडीटीव्हीच्या संस्थापक प्रवर्तकांनी सांगितले होते की सेबीच्या मंजुरीशिवाय ओपन ऑफर आणता येणार नाही.

 

अदानी ग्रुपला एनडीटीव्हीकडून एक पत्र प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, अदानी ग्रुप आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 99.5% भाग विकत घेऊ शकत नाही. यामागचे कारण असे देण्यात आले आहे की कंपनीचे मालक राधिका आणि प्रणय रॉय यांना बाजार नियामक सेबी ने नोव्हेंबर 2022 पर्यंत कोणत्याही सिक्युरिटीज व्यवहारात (Securities Transactions) सहभागी होण्यास बंदी घातली आहे.

 

कोणतीही चर्चा, संमती आणि पूर्वसूचना न देता बजावली नोटीस : NDTV
एनडीटीव्हीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने कोणतीही चर्चा, संमती आणि पूर्वसूचना न देता ते किंवा त्यांचे संस्थापक-प्रवर्तक राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांना अधिग्रहणाची नोटीस बजावली आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की व्हीसीपीएलने आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे अधिग्रहन केले आहे,
ज्यांच्याकडे एनटीव्हीमध्ये 29.18 टक्के भागीदारी आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

करारासाठी सेबीच्या परवानगीची गरज नाही : व्हीसीपीएल
या मुद्द्यावर व्हीसीपीएलने म्हटले होते की, या करारासाठी बाजार नियामक सेबीच्या मंजुरीची आवश्यकता नाही.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, व्हीसीपीएल म्हणते की, हा सौदा सेबीच्या 27 नोव्हेंबर 2020 रोजी एनडीटीव्हीचे
संस्थापक-प्रवर्तक राधिका आणि प्रणय रॉय यांच्यावर लावण्यात आलेल्या बंदी आदेशाच्या कक्षेत येत नाही.
सेबीच्या आदेशानुसार आरआरपीआर प्रकरणात कोणत्या प्रकारे पक्षकार नाही.

 

Web Title :- Adani Group | adani group to launch open offer for acquiring additional 26 per cent stake in ndtv on 17 october

 

हे देखील वाचा :

Pune Purandar Airport | पुरंदर विमानतळग्रस्तांसाठी मोबदल्याचे पर्याय लवकरच निश्चित; भूसंपादन प्रक्रियेच्या आदेशांची प्रतिक्षा

AAP Leader Vijay Kumbhar | दिल्लीच्या अबकारी धोरणाबाबत अण्णांचे पत्र हे दुर्दैवी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे – विजय कुंभार

Pune Pimpri Crime | तडीपारीचा खर्च म्हणून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करत मागितली खंडणी

 

Related Posts