IMPIMP

Narayan Rane | ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार’

by nagesh
Dasara Melava 2022 | union minister narayan rane said if uddhav thackeray will invite the i will go to dasara melava

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेवर दावा केला आहे. यांनंतर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे सांगत यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार असल्याचे नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, बाळासाहेबांचे काय गुण आहेत? जे घडलं ते योग्य घडलं. मी पण बंड केलं होतं. बंड करण्यामागे खूप कारणं आहेत. ते करावं लागतं, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही त्याला काय करणार? खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेंचाच होणार, उद्धव ठाकरेंना विचार द्यायला काय आहे, त्यांच्याकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? त्यामुळे एकनाथ शिंदे यांचाच मेळावा होणार असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

 

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचं विघ्न दूर झालं आहे. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रावर संकट आलं होतं.
पण आता ते नाहीय. हे सरकार (State Government) चांगलं काम करत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या मागे लागू नका ते एकदिवस सगळं काढतील.
त्यांच्याकडे नगरविकास (Urban Development) खातं होतं, त्यांना डिवचू नका सगळं आहे त्यांच्याकडे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

 

उद्धव ठाकरे सरपंच होण्याच्या लायकीचे नाहीत
उद्धव ठाकरे कंत्राटी मुख्यमंत्री होते. राज्याच्या इतिहासात नोंद घेतली इतक्या अपमानित पद्धतीने कुणाला पायउतार व्हावे लागलं नसेल.
घरात बसून मुख्यमंत्रिपद सांभाळायचे. अडीच वर्षात मंत्रालयात तीन तास गेले, ही कारकिर्द.
राज्यातील जनतेला काय मिळालं? मराठी माणसाला काय दिलं? हिंदुत्वासाठी (Hindutva) काय केले? उद्धव ठाकरेंना निवृत्ती मिळालीय आता गपचुप घरी बसा.
तुम्हाला जे काही मिळाले हे साहेबांच्या नावावर मिळाले. उद्धव ठाकरे हे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत असा घणाघात नारायण राणेंनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane on dasara melava 2022 shivsena cm eknath shinde uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Adani Group | NDTV मध्ये अतिरिक्त 26 टक्के भागीदारीसाठी 17 ऑक्टोबरला ओपन ऑफर आणणार अदानी ग्रुप

Pune Purandar Airport | पुरंदर विमानतळग्रस्तांसाठी मोबदल्याचे पर्याय लवकरच निश्चित; भूसंपादन प्रक्रियेच्या आदेशांची प्रतिक्षा

AAP Leader Vijay Kumbhar | दिल्लीच्या अबकारी धोरणाबाबत अण्णांचे पत्र हे दुर्दैवी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे – विजय कुंभार

 

Related Posts