IMPIMP

Siddhesh Ramdas Kadam | रामदास कदमांची काल भाजपावर टीका, आज सरकारने मुलाला दिलं मोठं पद! पण नियम मोडल्याची चर्चा

by sachinsitapure
Siddhesh-Ramdas-Kadam

मुंबई : Siddhesh Ramdas Kadam | शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटातील नेते रामदास कदम हे मागील काही दिवसांपासून सातत्याने भाजपावर (BJP) टीकास्त्र डागत आहेत. कालपरवाच त्यांनी, सर्व पक्षांना संपवून फक्त भाजपालाच जिवंत राहायचंय का, असा सवाल जागावाटपावरून केला होता. मात्र, सरकारने रामदास कदम यांची नाराजी दूर केली आहे. त्यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (Maharashtra Pollution Control Board) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

परंतु, सरकारने सिद्धेश कदम यांची नियुक्ती करताना एक नियम तोडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण नियमांनुसार पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रात २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या किंवा पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था/संघटनेत २५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती होऊ शकते.(Siddhesh Ramdas Kadam)

शिंदे-फडणवीस सरकारने सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यासाठी अगोदरपासूनच हालचाली सुरू केल्या होत्या.
सरकारने ६ मार्च रोजी एक अधिसूचना जारी करून आयएएस अधिकारी ए. एल. जरहाद यांना महाराष्ट्र प्रदुषण
नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षपदावरून दूर केले.

आता त्यांच्या ठिकाणी सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जरहाद हे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कार्यालयात गेले नाहीत, म्हणून सरकारने त्यांना हटवल्याचे कारण पुढे केले आहे.

Related Posts