IMPIMP

Side Effects Of AC | जर तुम्ही सुद्धा रोज करत असाल AC चा वापर, तर जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी

by nagesh
Side Effects Of AC | 5 side effects of air conditioner

सरकारसत्ता ऑनलाइन – Side Effects Of AC | कडाक्याच्या उन्हापासून आणि घामापासून वाचण्यासाठी लोक उन्हाळ्यात अनेकदा एअर कंडिशनरचा (Air Conditioner) आधार घेतात, पण माणसाची ही गरज कधी अंगवळणी पडते, हेही कळत नाही (Side Effects Of AC). तापमानात किंचित वाढ होताच लोक एसीकडे धाव घेतात, पण विश्रांतीचे हे दोन क्षण तुमच्यासाठी किती हानिकारक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का (Health Effects Of AC) ?

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज घर, ऑफिस, गाडी सर्व काही वातानुकूलित झाले आहे. अशा स्थितीत तुम्ही दिवसातील अनेक तास फक्त एसीमध्ये घालवता. एसीमध्ये सतत बसल्याने एसीची थंड हवा उष्णतेपासून आराम देते, तर दुसरीकडे त्याचे अनेक तोटेही होऊ शकतात (Side Effects Of AC).

 

1. ताप किंवा सर्दी (Fever or Cold)
एसी सुरू असलेल्या ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्यास अनेकांना सर्दी आणि तापही येतो. विशेषतः बाहेर खूप गरम असेल तर या थंड-उष्ण वातावरणात आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सतत एअर कंडिशनरमध्ये राहू नका.

 

2. सांधेदुखी (Joint Pain)
एसीमुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. तसेच स्नायू दुखण्याची समस्या होऊ (Muscle Pain) शकते. ही समस्या भविष्यात हाडांशी संबंधित गंभीर आजारांनाही जन्म देऊ शकते.

 

3. त्वचेचा कोरडेपणा (Dryness Of Skin)
एसी तुमच्या शरीराला डिहायड्रेट (Dehydrate) करते. त्वचेतील ओलावा बाहेर काढते. यामुळेच एसीमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे त्वचा कोरडी जाणवते. एसीमध्ये जास्त वेळ बसावे लागत असेल तर पुरेसे पाणी पिण्यास विसरू नका.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. लठ्ठपणा (Obesity)
एसीचा अतिवापर केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. कमी तापमानामुळे शरीर अधिक सक्रिय राहू शकत नाही
आणि शरीरातील ऊर्जा योग्य प्रमाणात वापरली जात नाही. त्यामुळे शरीरातील चरबी वाढते.

 

5. मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम (Bad Effects On Brain Health)
जेव्हा एसीचे तापमान खूप कमी होते, तेव्हा मेंदूच्या पेशीही (Brain Cells)आकसतात, ज्यामुळे मेंदूच्या क्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
इतकेच नाही तर तुम्हाला सतत चक्कर येण्याची समस्या (Dizziness) देखील होऊ शकते. अनेकांना डोकेदुखीची (Headache) तक्रारही सुरू होते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#Lifestyle #Health  AC #Air Conditioner #Joint Pain #Blood Pressure #AC Side Effects #Lifestyle And Relationship #Health And Medicine #एयर कंडीशनर #हेल्थ टिप्स

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Side Effects Of AC | 5 side effects of air conditioner

 

हे देखील वाचा :

Yami Gautam Insulted | यामी गौतमचा प्रसिद्ध डिझायनरनं केला होता भयंकर अपमान, त्याचवेळी तिनं घेतला ‘हा’ निर्णय….

Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding | आलिया आणि रणबीर लग्नामध्ये ‘या’ दिग्गज कलाकारांना देणार नाही आमंत्रण..! जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार?

Syed Bhai Passes Away | मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यद भाई यांचं निधन

 

Related Posts