IMPIMP

Social Media Convention | सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकतेची गरज; मराठी सोशल मीडिया संमेलनात तज्ज्ञांचे मत

by nagesh
Social Media Convention | The need for awareness about cybercrime; Expert opinion in Marathi social media Convention

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Social Media Convention | सध्याच्या धावपळीच्या युगात सायबर गुन्ह्यांत (Cyber Crime) प्रचंड वाढ होताना दिसत आहे. याबरोबरच आर्थिक आणि सायबर बुलिंग, स्टॉकिंग यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा नागरिक बदनामीच्या भीतीने तक्रारी नोंदविण्यास धजावत नाहीत. परंतु, सायबर गुन्ह्यांमध्ये जितक्या लवकर तक्रार नोंदवली जाईल, तितक्या लवकर कारवाई करणे सोपे होते. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती मनात न बाळगता तक्रार नोंदविण्यासाठी पुढे यावे,” असं आवाहन सायबर गुन्हे तज्ज्ञांकडून (Cyber Crime expert) करण्यात आलं आहे. (Social Media Convention)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुण्यातील दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये (Pune Marathi Social Media Convention) ‘सायबर क्राइम: रिपोर्ट करा, कायदा आहे’ या विषयावरील चर्चासत्रात सायबर कायदे तज्ज्ञ ॲड. वैशाली भागवत (Adv. Vaishali Bhagwat), रिस्पॉन्सिबल नेटिझम’च्या संस्थापिका सोनाली पाटणकर (Sonali Patankar), आणि सिव्हिल डिफेन्सच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर (Dr. Rashmi Karandikar) यांनी सहभाग नोंदविला होता. या चर्चासत्राची सूत्रे उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्याकडे होती. (Social Media Convention)

”ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण सध्या अधिक आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसोबत इन्शुरन्स फ्रॉड, अविवाहित, दुसरे लग्न करण्यास इच्छुक महिलांसोबत कस्टम गिफ्ट फ्रॉड’चे प्रकार घडतात. तसेच, सायबर स्टॉकिंग, सायबर बुलिंग’चे प्रमाण देखील जास्त आहे. पुरुषांबाबत सर्वाधिक घडणारा प्रकार म्हणजे सेक्सटॉर्शन आहे, तर लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराचे व्हीडिओ प्रसारित करण्याचे प्रमाणदेखील अधिक असल्याचं,” सिव्हिल डिफेन्सच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

”भारतीय दंडसंहितेमध्ये सायबर गुन्हेविषयक कायद्याचा समावेश करण्यात आला. तसेच लहान मुलांसंबंधित गुन्ह्यांसाठी ‘पॉक्सो’ हा कायदा आहे. आर्थिक नुकसान भरपाईसाठी कायदा आहे, तसेच एखाद्या आक्षेपार्ह कंटेंट बाबत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचं,” सायबर कायदा तज्ज्ञ ॲड. वैशाली भागवत यांनी सांगितलं.

 

“मॉर्फिंगसारख्या सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या तरुणांपैकी काही जणांमध्ये आत्महत्येची मानसिकता निर्माण होते.
तसेच, सोशल मीडियावर वापरली जाणारी भाषा ही अतिशय गलिच्छ असते.
पण, अनेकदा लोक भीतीपोटी याबाबत तक्रार करत नाहीत.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सायबर गुन्ह्याचे बळी कोणीही, कधीही पडू शकतो.
त्यामुळे त्याची नोंद होणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.
तसेच, आपण जबाबदारीने सोशल मीडिया वापरला पाहिजे.”
असं रिस्पॉन्सिबल नेटिझम’च्या संस्थापिका सोनाली पाटणकर यांनी सागितलं आहे.

 

Web Title :- Social Media Convention | The need for awareness about cybercrime; Expert opinion in Marathi social media Convention

 

हे देखील वाचा :

Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल’, राष्ट्रवादीनं केली ‘ही’ मोठी मागणी

Urfi Javed Topless Video | टॉपलेस होऊन घराबाहेर पडली उर्फी जावेद, व्हिडिओतील तिचा अंदाज पाहून चाहते झाले घायाळ…

Gopichand Padalkar On Sharad Pawar | पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका; म्हणाले – ‘बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय’

 

Related Posts