IMPIMP

Special Public Prosecutor Praveen Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची तेजस मोरे याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार ! गोपनीयतेचा भंग करुन स्पाय कॅमेरा लावून केले चित्रिकरण

by nagesh
Special Public Prosecutor Praveen Chavan | Adv. Praveen Chavan lodges complaint with police against Tejas More Spy camera shooting in violation of privacy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनSpecial Public Prosecutor Praveen Chavan | भाजपचे नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांना मोक्काच्या (MCOCA) Mokka गुन्ह्यात अडविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर करुन एकच खळबळ उडवून दिली होती. त्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Special Public Prosecutor Praveen Chavan) त्यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन होते. याप्रकरणी आता अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) तक्रार अर्ज दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) यांनी सांगितले की, अ‍ॅड. प्रवीण चव्हाण (Special Public Prosecutor Praveen Chavan) यांनी पोलीस ठाण्यात तेजस मोरे (Tejas More) याच्याविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. विना परवाना आपल्या कार्यालयात छुपा कॅमेरा (Spy Camera) बसवून त्याने हे चित्रिकरण केले आहे. त्यामुळे आपल्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे त्यात म्हटले आहे. तक्रार अर्जाची चौकशी होऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

 

प्रवीण चव्हाण हे बीआरएच Bhaichand Hirachand Raisoni (BHR) तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करत होते.
हे प्रकरण उद्भवल्यानंतर त्यांनी राज्य शासनाकडे (Maharashtra Government) विशेष सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिला आहे.

 

प्रवीण चव्हाण यांच्या मॉर्डन कॉलनी (Model Colony Pune) येथील कार्यालयात घड्याळामध्ये स्पाय कॅमेरा लपवून त्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते.
ते उघड झाल्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी हा सर्व प्रकार जळगावमधील लोकांना हाताशी धरुन तेजस मोरे याने केल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर आता त्यांनी अधिकृत तक्रार दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, तेजस मोरे यांनी आपण घड्याळ भेट दिले नसल्याचा खुलासा केला असून आपल्याला प्रवीण चव्हाण यांनी जामीन मिळवून दिल्याने त्यांना आपण देव मानत होतो.
परंतु, त्यांनी आपल्याकडून बेकायदेशीर कामे करुन घेतली.
या स्टिंग ऑपरेशनमुळे (Sting Operation) त्यांचा काळा चेहरा सर्वांसमोर आल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Special Public Prosecutor Praveen Chavan | Adv. Praveen Chavan lodges complaint with police against Tejas More Spy camera shooting in violation of privacy

 

हे देखील वाचा :

Governor vs Thackeray Government | राज्यपालांकडून ठाकरे सरकारला आणखी एक धक्का; विशेषाधिकार वापरत घेतला ‘हा’ निर्णय

Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन

Hardik Pandya Yo-Yo Test | हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये खेळणार की नाही?; रिपोर्ट आला समोर

 

Related Posts