IMPIMP

SSY | एक रुपया रोजची बचत करून तयार करू शकता 15 लाखाचा मोठा फंड, जाणून घ्या कसा ?

by nagesh
SSY | sukanya samriddhi yojana save 1 rupee daily and earn 15 lakh at maturity check details know how SSY

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSSY | ही एक अशी सरकारी योजना आहे, जिथे तुम्ही खूप कमी पैसे गुंतवून मोठी रक्कम तयार करू शकता. या सरकारी योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना SSY (sukanya samriddhi yojana). या योजनेद्वारे, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे भविष्य सुरक्षित करू शकता, तसेच या उत्तम गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये पैसे गुंतवून प्राप्तीकर सुद्धा वाचवू शकता. या योजनेचा लाभ दररोज 1 रुपये वाचवून देखील मिळू शकतो. याबाबत जाणून घेवूयात…

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठीची एक अल्पबचत योजना आहे, जी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. सुकन्या ही लघु बचत योजनांमधील सर्वोत्तम व्याजदर योजना आहे.

इतक्या रुपयांनी करता येऊ शकते गुंतवणूक
यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता. हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.

किती मिळते व्याज
आता एसएसवाय (Sukanya Samriddhi Account) मध्ये 7.6 टक्केच्या दराने व्याज दिले जात आहे जे इन्कम टॅक्स सूटसह आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मॅच्युरिटीवर मिळतील 15 लाखापेक्षा जास्त
जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे. (SSY)

कसे उघडायचे खाते
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या अधिकृत शाखेत उघडता येते.
या योजनेंतर्गत खाते मुलीच्या जन्मानंतर, 10 वर्षे वयाच्या आधी किमान 250 रुपये ठेवीसह उघडले जाऊ शकते.
चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील.

कधीपर्यंत चालवता येते खाते
हे अकाऊंट मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत सुरू ठेवता येऊ शकता.
तुम्ही मॅच्युरिटी अमाऊंट मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर काढू शकता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रक्कम जमा न झाल्यास किती लागते पेनल्टी
दरवर्षी 250 रुपये किमान ठेव न केल्यास, खाते बंद केले जाईल आणि त्या वर्षासाठी जमा करावयाच्या किमान रकमेसह दरवर्षी 50 रुपये दंडासह ते पुन्हा चालू केले जाऊ शकते.
खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षांपर्यंत पुन्हा सक्रिय करता येऊ शकते.

Web Title : SSY | sukanya samriddhi yojana save 1 rupee daily and earn 15 lakh at maturity check details know how SSY

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stocks | अवघ्या 12 दिवसात ‘या’ मल्टीबॅगर पेनी स्टॉकने शेयर होल्डरर्सचे पैसे केले दुप्पट, जाणून घ्या स्टॉक प्राईस

Google Chrome वर कधीही करू नका या चूका, हॅकिंगला पडू शकता बळी; अँटीव्हायरस सुद्धा करणार नाही काम

Pune Crime | थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकावर FIR

Related Posts