IMPIMP

Google Chrome वर कधीही करू नका या चूका, हॅकिंगला पडू शकता बळी; अँटीव्हायरस सुद्धा करणार नाही काम

by nagesh
Google Chrome | do not make these mistakes on google chrome

नवी दिल्ली : वृत्त संस्थाGoogle Chrome | इंटरनेटचे अनेक फायदे आणि तोटेही आहेत. अशा स्थितीत इंटरनेट वापरताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. बरेच लोक इंटरनेट वापरण्यासाठी Google Chrome ब्राउझर वापरतात. गुगल क्रोममध्ये पुन्हा पुन्हा लॉग इन टाळण्यासाठी अनेकदा लोक जीमेलसह (Gmail) सेवांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेव्ह करतात. परंतु, लक्षात ठेवा की असे केल्याने यूजरला महागात पडू शकते. अशा वेळी गुगल क्रोम वापरताना चुका करू नका, अन्यथा हॅकिंगला (Hacking) बळी पडू शकता. (Do Not Make These Mistakes On Google Chrome)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हॅकिंगला पडू शकता बळी

अलीकडेच सिक्युरिटी एक्सपर्ट कंपनी AhnLab ने एका अहवालात खुलासा केला आहे की व्हायरस गुगल क्रोम वरून तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरू शकतो. वास्तविक या फर्मने रेडलाइन स्टीलर नावाचा मालवेअर शोधला आहे. हा मालवेअर गुगल क्रोममध्ये सेव्ह केलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरण्याचे काम करतो. अशा परिस्थितीत हॅकर्स या मालवेअरद्वारे तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात. यासोबतच ते बँकिंग संबंधी फसवणुक करू शकतात.

अँटीव्हायरस देखील करणार नाही काम (Antivirus won’t work either)

रिपोर्टनुसार हा मालवेअर खूपच धोकादायक आहे. या मालवेअरवर अँटीव्हायरसचाही काही परिणाम होत नाही. असे सांगितले जात आहे की हा मालवेअर कंपनीच्या व्हीपीएनमध्ये प्रवेश करून लॉगिन आणि पासवर्ड चोरण्यात पटाईत आहे. अशा स्थितीत, यूजरना त्यांचा लॉगिन आयडी पासवर्ड गुगल क्रोममध्ये सेव्ह न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या मालवेअरवर अँटीव्हायरसचा कोणताही परिणाम होत नाही. (Google Chrome)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

असा करा बचाव

हा मालवेअर टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. गुगल क्रोम ब्राउझरवर पासवर्ड चुकूनही सेव्ह करू नका. तसेच, वेळोवेळी तुमचा पासवर्ड बदलत राहा. नेहमी सुरक्षित आणि अधिकृत वेबसाइट वापरा. याशिवाय मेल, मेसेज किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. विना संरक्षणा वैयक्तिक डेटा आणि इतर महत्त्वाच्या फाइल्स सेव्ह करू नका.

Web Title : Google Chrome | do not make these mistakes on google chrome

हे देखील वाचा :

Pune Crime | थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकावर FIR

Train Accident Compensation | रेल्वे दुर्घटनेत जीव गमावणार्‍यांच्या कुटुंबियांना भरपाईची घोषणा, रेल्वेने दिली माहिती

Pune Crime | विनयभंग करणार्‍याची कॉलर पकडल्याने अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील घटना

Related Posts