IMPIMP

Stock Market | रतन टाटा यांच्या कंपनीचे झाले 21400 कोटींचे नुकसान, मुकेश अंबानी यांना झाला मोठा फायदा; जाणून घ्या नेमकं काय झालं

by nagesh
Stock Market | ratan tata company suffered a loss of 21400 crores mukesh ambani got a big profit

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शेयर बाजारात (Stock Market) आज नफा वसूली दिसून आली आहे. ज्यामुळे रतन टाटा (Ratan Tata) यांची कंपनी टीसीएसच्या शेयरमध्ये (tcs share price) घसरण दिसून आली. ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपयांवरून खाली आले. तर दुसरीकडे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स (Reliance) सातत्याने नवीन उंचीवर (Stock Market) पोहचत आहे.

आज कंपनीच्या शेयरमध्ये सुमारे एक टक्का तेजी दिसून आली. ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 16.15 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. मात्र, गुंतवणुकदारांचे नुकसान झाले आहे. शेयर बाजारात (Stock Market) या दोन कंपन्यांचे आकडे काय सांगतात ते जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

टीसीएसच्या शेयरमध्ये झाली घसरण (Shares of TCS fell)
देशातील दुसर्‍या मोठ्या कंपनीच्या शेयरमध्ये घसरण दिसून आली. कंपनीचा शेयर दिड टक्क्याच्या घसरणीसह म्हणजे सुमारे 58 रुपये घसररून 3779 रुपयांवर बंद झाला आहे.

ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे. आज कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 21436 कोटी रुपयात घसरण दिसून आली. ज्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 13,97,871.51 कोटी रुपयांवर आले आहे.

रिलायन्सच्या शेयरमध्ये तेजी (Reliance shares rise)
तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचा शेयर 0.90 टक्केची तेजी म्हणजे 22.85 रुपये प्रति शेयर वाढून 2548.05 रुपयांवर बंद झाला.
तर व्यवहाराच्या सत्रादरम्यान कंपनीचा शेयर 2565 रुपयांसह सर्वोच्च स्तरावर सुद्धा पोहचला.
ज्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 15 हजार कोटी रुपयांची वाढ दिसून आली.
आज कंपनीचे मार्केट कॅप 16.15 लाख कोटी रुपयांवर आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शेयर बाजारात 400 पेक्षा जास्त अंकाची घसरण

आज शेयर बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सच्या शेयरमध्ये 410 अंकांची घसरण दिसून आली.
ज्यामुळे सेन्सेक्स 60 हजार अंकाच्या खाली येत 59667.60 अंकावर बंद झाला आहे.
तर आज सेन्सेक्सची सुरूवात 60285 अंकासोबत झाली होती.

एक दिवसापूर्वी सेन्सेक्स 60077 अंकावर होता.
मार्केट कॅपबाबत बोलायचे तर 142134.38 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हे गुंतवणुकदारांचे सुद्धा नुकसान आहे.

 

Web Title :- Stock Market | ratan tata company suffered a loss of 21400 crores mukesh ambani got a big profit

 

हे देखील वाचा :

TATA Group च्या ‘या’ 2 शेयरमधून राकेश झुनझुनवाला यांनी एका महिन्यात कमावले 893 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का?

Modi Government | आता बिगर सरकारी लोकांना सुद्धा मिळू शकते मोदी सरकारकडून पेन्शन, करावे लागेल या अटींचे पालन

Pune Corporation | समान पाणी मिळणार असेल तर मीटर कशाला? काँग्रेस गटनेते आबा बागुल यांचा सवाल

 

Related Posts