IMPIMP

Modi Government | आता बिगर सरकारी लोकांना सुद्धा मिळू शकते मोदी सरकारकडून पेन्शन, करावे लागेल या अटींचे पालन

by nagesh
7th Pay Commission DA Arear | 7th pay commission da arear news government employees dearness allowance 18 months da arear rupees 2 lakh come in salary pm narendra modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रायव्हेट कंपनीत काम करणारे, विक्रेते, टपरीवाले, दुकानदार, व्यापार्‍यांसह कमी उत्पन्न असलेल्यांना जर वृद्धत्वाची चिंता असेल तर ते मोदी सरकारच्या (Modi Government) योजनेत सहभागी होऊन निश्चिंत होऊ शकतात. या योजनेचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा हा आहे की, 60 व्या वर्षापासून आयुष्यभर मासिक 5000 रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नी दोघांनी योजनेचा लाभ घेतला तर मासिक 10 हजार रुपये मोदी सरकार (Modi Government) पेन्शन देईल जी मोठी मदत असेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यासाठी मोदी (Modi Government) सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक करून लोक 60 वर्षानंतर वृद्धत्वात आयुष्यभर पेन्शचा लाभ घेत आहेत. पेन्शनची ही रक्कम मोठी नाही परंतु जे कमी गुंतवणूक करू शकतात त्यांच्यासाठी ही योजना आहे.

या योजनेची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. 2020-21 मध्ये अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन सिस्टमच्या (national pension scheme) खातेधारकांच्या संख्येत 23 टक्केची वाढ नोंदली गेली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत या योजनते एकुण खातेधारकांची संख्या वाढून 4.24 कोटी रूपये झाली आहे.

यामध्ये जर पती-पत्नी दोघांनी गुंतवणूक केली तर 60 वर्षानंतर दोघांना मिळून 10,000 रुपये महिना पेन्शन मिळते. ज्यामधून अनेक मासिक गरजा पूर्ण होतात. छोट्या-छोट्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही.

योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे.
या योजनेत सहभागी होणार्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रुपये महिना पेन्शन मिळेल.
जर पती-पत्नी दोघांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांना 60 वर्षानंतर 10,000 रुपये महिना पेन्शन मिळेल.
वयाच्या हिशेबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो.

सर्वात कमी प्रीमियम 18 वर्षाच्या वयात योजनेचा लाभ घेतल्यास द्यावा लागतो.
सर्वात जास्त प्रीमियम 30 वर्षाच्यानंतर द्यावा लागतो. कारण पेन्शनची किमान रक्कम 1000 मासिक आणि कमाल 5000 मासिक ठरवलेली आहे.
प्रीमियम देताना पेन्शनच्या रक्कमेला आधार बनवले जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

जर पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर…

 

योजनेंतर्गत पेन्शन घेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पेन्शन नॉमिनीला आयुष्यभर मिळत राहील.
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एनपीएसप्रमाणे समान कर सवलत मिळते.
आयकर कायदा, कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत या योजनेत करात सवलत मिळते.

जर वयाच्या 60 वर्षाच्या आत मृत्यू झाला तर…
पेन्शनचा लाभ घेणार्‍याचा मृत्यू 60 वर्षाच्या अगोदर झाला तर त्या स्थितीत सुद्धा पेन्शन त्याच्या नॉमिनीला दिली जाईल.
कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात खाते उघडून याचा लाभ घेता येऊ शकतो.

 

Web Title :- Modi Government | now non government people can also get pension central government these conditions will have be followed

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | समान पाणी मिळणार असेल तर मीटर कशाला? काँग्रेस गटनेते आबा बागुल यांचा सवाल

Pune Crime | बीट मार्शलला विटेने मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात 27 वर्षीय तरूणीचा दोघांना विनयभंग

Maharashtra Rains | आगामी 48 तासांत महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; पुण्यासह ‘या’ जिल्हांना ‘अलर्ट’

 

Related Posts