IMPIMP

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी खाते दुसर्‍या बँकेत करायचे असेल ट्रान्सफर, तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स; जाणून घ्या

by nagesh
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | sukanya samriddhi account want to transfer another bank follow these steps

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSukanya Samriddhi Yojana (SSY) | केंद्र सरकारने (Central Government) महिला आणि मुलींना आर्थिक मदत
देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांद्वारे महिला आणि मुलींना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे भविष्यही सुरक्षित होते. यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. Sukanya Samriddhi Yojana (SSY)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या योजनेंतर्गत, 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावावर आई – वडील खाते उघडू शकतात. ज्यामध्ये मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.

 

सुकन्या समृद्धी योजने Sukanya Samriddhi Yojana (SSY) अंतर्गत, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी आणि 21 वर्षांची झाल्यावर लग्नासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो. सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. या योजनेत, पालक त्यांच्या मुलीच्या नावावर सुरुवातीला किमान 1000 रुपये आणि नंतर 100 रुपयांच्या पटीत जमा करू शकतात.

 

एका आर्थिक वर्षात या खात्यात जमा करता येणारी कमाल रक्कम रु. 1.5 लाख आहे, जिच्यावर प्राप्तीकरातूनही सूट देण्यात आली आहे.

 

शहर बदलल्यास येते अडचण –

अनेक वेळा बदली झाल्यानंतर सुकन्या समृद्धी खाते ऑपरेट करताना अडचणी येतात. अशा स्थितीत सुकन्या समृद्धी खाते दुसर्‍या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसच्या दुसर्‍या शाखेत ट्रान्सफर करता येऊ शकते.

यामुळे तुमचे सुकन्या समृद्धी खाते बंदही होत नाही आणि तुम्हाला योजनेचा पूर्ण लाभही वेळेवर मिळतो. एका मुलीच्या नावाने फक्त एकच सुकन्या समृद्धी खाते उघडता येते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कसे ट्रान्सफर होईल सुकन्या समृद्धी खाते (How to Transfer Sukanya Samriddhi Account)

खाते ट्रान्सफर करण्यासाठी, तुमच्या बँकेत अर्ज द्यावा लागेल.

ज्या बँक, शाखा आणि शहरामध्ये खाते ट्रान्सफर करायचे आहे त्याचा तपशीलही सोबत द्यावा लागेल.

जुनी बँक सुकन्या समृद्धी खात्यातील संपूर्ण रकमेचा ड्राफ्ट तयार करेल आणि तुम्हाला देईल.

यानंतर जुनी बँक तुमचे खाते तुम्हाला हव्या त्या बँकेत ट्रान्सफर करेल.

येथे ड्राफ्ट जमा करून आणि केवायसी तपशील दिल्यानंतर या खात्यातील गुंतवणूक पुन्हा सुरू करता येईल.

 

Web Title :-  Sukanya Samriddhi Yojana (SSY) | sukanya samriddhi account want to transfer another bank follow these steps

 

हे देखील वाचा :

Radhe Shyam Box Office Collection | बॉलिवूड चित्रपट राधे श्यामने दोन दिवसांत केली तब्बल 100 कोटी रूपयांची कमाई

Sarsenapati Hambirrao Movie Release Date | बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेला होणार सर्वत्र प्रदर्शित

Benefits Of Not Wearing A Bra | ‘ब्रा’ न घालण्याचे होतील ‘हे’ 10 मोठे फ़ायदे, शक्य तेवढ्या लवकर ’ब्रा’ला करा टाटा-बाय-बाय

 

Related Posts