IMPIMP

Sunny XI Karandak | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! आर्यन क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय !!

by nagesh
 Sunny XI Karandak | 'Sunny XI Karandak' Championship Cricket Tournament! Aryan Cricket Club team's second win in a row !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Sunny XI Karandak | सनी इलेव्हन तर्फे आयोजित ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत अक्षय काळोखे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन क्रिकेट क्लब संघाने एसके डॉमिनेटर्स संघाचा ९ गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवित बाद फेरीकडे वाटचाल केली. (Sunny XI Karandak)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या क गटाच्या सामन्यात अक्षय काळोखे याची अचूक गोलंदाजी आणि त्यानंतर ऋषीकेश सोनावणे आणि कौशल तांबे या सलामीवीरांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर आर्यन क्रिकेट क्लबने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसके डॉमिनेटर्स संघाने १६० धावांचे आव्हान उभे केले. रोहीत खरात (५७ धावा), यश माने (३० धावा), सुरज परदेशी (२८ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. अक्षय काळोखे याने १९ धावात ४ गडी टिपत अचूक गोलंदाजी केली. (Sunny XI Karandak)

 

हे आव्हान आर्यन क्रिकेट क्लबने १५ षटकात व १ गडी गमावून सहज पूर्ण केले. ऋषीकेश सोनावणे याने २८ चेंडूत ८
चौकार आणि ५ षटकारांसह ६६ धावा तर, कौशल तांबे याने ३९ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५४ धावांची
खेळी केली. पुरंजयसिंग राठोड याने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. कौशल तांबे आणि ऋषीकेश यांनी ४८ चेंडूत ८४
धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. त्यानंतर कौशल याने पुरंजयसिंग याच्या साथीत ५६ चेंडूत ८०
धावांची अभेद्य भागिदारी करून संघाचा विजय साकार केला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसके डॉमिनेटर्सः २० षटकात ९ गडी बाद १६० धावा (रोहीत खरात ५७ (३५, ६ चौकार, ४ षटकार), यश माने ३०,
सुरज परदेशी २८, अक्षय काळोखे ४-१९) पराभूत वि. आर्यन क्रिकेट क्लबः १५ षटकात १ गडी बाद १६४ धावा
(ऋषीकेश सोनावणे ६६ (२८, ८ चौकार, ५ षटकार), कौशल तांबे नाबाद ५४ (३९, ६ चौकार, २ षटकार),
पुरंजयसिंग राठोड नाबाद ४२ (२४, २ चौकार, ४ षटकार); सामनावीरः अक्षय काळोखे;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sunny XI Karandak | ‘Sunny XI Karandak’ Championship Cricket Tournament! Aryan Cricket Club team’s second win in a row !!

 

हे देखील वाचा :

Basava Seva Pratishthan | महात्मा बसवण्णा स्थापित ‘अनुभव मंटप’ ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी; प्रसिध्द व्याख्याते बसवकुमार पाटील यांचे प्रतिपादन

Journalist Amol Kavitkar | भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर

Pune Police Crime News | अवैध धंद्यांबाबत DG कंट्रोलकडून शहर नियंत्रण कक्षात ‘कॉल’, पोलिस आयुक्तांचे ‘क्रॉस रेड’ करण्याचे उपायुक्तांना आदेश

 

Related Posts