IMPIMP

Sushma Andhare On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना शिवरायांबद्दल द्वेष, आकस; पुण्यात सुषमा अंधारेंचा घणाघात

by nagesh
Sushma Andhare On Devendra Fadnavis

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Sushma Andhare On Devendra Fadnavis | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना पदावरुन हटवण्याच्या मागणीसाठी आज (मंगळवार) पुणे बंदचे (Pune Band) आवाहन करण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर पुण्यात आज मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या समारोपाच्यावेळी बोलताना शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजप (BJP) आणि नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेवर भाष्य करताना या घटनेचे समर्थन करता येणार नसल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. (Sushma Andhare On Devendra Fadnavis)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुषमा अंधारे म्हणाल्या, चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेकीची घटना वाईट असून त्याचे समर्थन करता येणार नाही. पण शाईचा वापर करायचा असेल तर ती एकत्रीत करुन बोटावर लावा. याच बोटांच्या ठशातून भाजपच्या विरोधात मतदान करुन त्यांना धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले. (Sushma Andhare On Devendra Fadnavis)

 

शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे (Manoj Garbade) या युवकावर पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) 307 चे कलम लावले आहे. यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, चंद्रकांत दादा तुम्हाला पोलीस संरक्षण होते. त्या गरबडे यांना नव्हते. तरी तुम्ही इतक्या आकसापोटी कारवाई करायला लावली. पोलिसांवर देखील चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचे सांगत अंधारे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

 

राज्यपाल पदाचा आदर, पण…
भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धा सुरु आहे. आम्हाला राज्यपाल पदाचा आदर आहे. मात्र त्या पदावर बसलेली व्यक्ती लायक नसल्याचे सांगत सुषमा अंधारे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली केली. कोश्यारी यांना त्यांच्या राज्यपाल पदाचा विसर पडला आहे. कोश्यारी हे राज्यपाल कमी आणि भाजपचे नेते असल्याचे वागत आहेत. राज्यपालांनी महापुरुषांचा अवमान करणारे वक्तव्य केले मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना एकदाही आडवले नाही. तसेच त्यांना परत बोलवा असे पत्र देखील एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केंद्र सरकारला (Central Government) पाठवले नसल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीसांवर घणाघात
राज्यामध्ये घाणेरडे राजकारण सुरु असून राज्यकर्त्यांचे हे सुनियोजित षडयंत्र असल्यासारखे वाटते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल द्वेष, आकस आहे. जर त्यांना आदर असता तर त्यांनी हे असले प्रकार थांबवले असते. पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) मल्लीकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी टीका केल्यानंतर ते तावातावाने धावून आले. तुमच्या मंत्रिमंडळातील माणसं वारस मानण्याच्या लायकीचे नाहीत, असा घणाघात अंधारे यांनी यावेळी केला.

 

वाचाळवीर नेत्यांना आवरा
भाजप नेते आणि राज्यपाल यांच्याकडून अनेक वेळा महापुरुषांचा अवमान करण्यात आला आहे.
परंतु मंत्रिमंडळात एकदाही याबाबत ठराव झालेला नाही.
ठराव पारित झाला नाही तर घराघरातील आक्रोश तुमच्यापर्य़ंत पोहोचवला जाईल, असा इशारा देताना वाचाळवीर नेत्यांना आवरा असा इशारा त्यांनी दिला.
तसेच शिवरायांचे नाव घेऊन मते मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असेही अंधारे म्हणाल्या.

 

खासदार उदयनराजेंना टोला
आजच्या मुकमोर्चामध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) सहभागी झाले होते.
मात्र ते भाषण न करताच निघून गेले. यावरुन अंधारे यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला.
त्या म्हणाल्या आजच्या मोर्चात शिवरायांचे वंशज उदयनराजे सहभागी झाले. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे.
त्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले मात्र भाषण न करताच निघून गेले.
कदाचित ते खासदारकीचा आणि भाजपचा राजीनामा देण्यासाठी गेले असतील, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sushma Andhare On Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जेवायला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले, बाणेर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये भरदिवसा 66 लाखांची घरफोडी

Pune Crime | ऑनलाईन वाईन मागवणं तरुणीला पडलं महागात, सायबर गुन्हेगारांकडून 1 लाखाचा गंडा; येरवडा परिसरातील घटना

Rajesh Tope | ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये; ही राज्य सरकारची जबाबदारी’ – राजेश टोपे

 

Related Posts