IMPIMP

Pune Crime | जेवायला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले, बाणेर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये भरदिवसा 66 लाखांची घरफोडी

by nagesh
Pune Crime | At the beginning of the new year, house burglaries in the area of Kothrud, Sinhagad road, 64 lakhs of compensation was lost.me | Went to dinner and thieves cleaned the house, 66 lakh house burglary in broad daylight in elite society of Baner area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | पुणे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच दिवसा घरफोडी (Burglary) होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पुणे शहरातील औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 66 लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना (Pune Crime) रविवारी (दि.11) दुपारी दीड ते चार या दरम्यान सिंध हौसिंग सोसायटी (Sindh Housing Society), बाणेर रोड, औंध येथे घडली.

 

याबाबत समीर रामेश्वर दयाल Sameer Rameshwar Dayal (वय-55) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी 454, 380 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके (PSI Rupesh Chalke) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर दयाल यांची पिंपरी चिंचवड परिसरात पॅकिंग करणारी कंपनी असून ते औंध परिसरात राहतात. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ते कुटुंबासोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागील दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील बेडरुममधील कपाटाचे लॉक तोडून 205 तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewellery), 4 तोळे हिऱ्याचे दागिने (Diamond Jewellery), चांदीचे दागिने (Silver Jewellery), प्लॅटीनमचे दागिने (Platinum Jewellery) व रोख रक्कम (Cash) असा एकूण 66 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

समीर दयाल हे दुपारी चारच्या सुमारास घरी आले असता त्यांना बंगल्याचा मागील दरवाजा उघडा दिसला.
त्यांनी बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून आतील किमती ऐवज चोरुन नेल्याचे आढळून आले.
त्यांनी तातडीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (DCP),
सहायक पोलीस आयुक्त (ACP) यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रुपेश चाळके करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Went to dinner and thieves cleaned the house, 66 lakh house burglary in broad daylight in elite society of Baner area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ऑनलाईन वाईन मागवणं तरुणीला पडलं महागात, सायबर गुन्हेगारांकडून 1 लाखाचा गंडा; येरवडा परिसरातील घटना

Rajesh Tope | ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये; ही राज्य सरकारची जबाबदारी’ – राजेश टोपे

Gunaratna Sadavarte-Pune Band | पुण्यातील मुक मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंची वेगळीच मागणी, म्हणाले…

Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts