IMPIMP

Swatantra Veer Savarkar | ‘सावरकर हे भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायला आणि चघळायचा विषय झाला आहे’

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis react uddhav thackeray challenge get election loksabha vidhansabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते आणि खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा (Bharat Jodo Yatra) कर्नाटक राज्यात पोहोचली आहे. या यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी एका ठिकाणी भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांना लक्ष्य करत त्यांच्यावर भाष्य केले होते. त्यामुळे गांधीवर आणि काँग्रेस पक्षावर भाजपकडून (BJP) टीका केली जात आहे. तसेच महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांना देखील लक्ष्य केले आहे. राहूल गांधी यांना सावरकरांवरील (Swatantra Veer Savarkar) टीकेवर उद्धव ठाकरे जाब विचारणार की नाही, शिवसेना (Shivsena) राहूल गांधी यांचा निषेध करणार आहे की नाही, असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले आहेत. त्यावरुन आता शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राहूल गाधींनी कोणतेही वक्तव्य केले की, भाजपवाल्यांना सावरकर (Swatantra Veer Savarkar) आठवतात. तथाकथित माफी प्रकरणाचा रिकामा खुळखुळा वाजवीत बसण्यापेक्षा सावरकरांचे हिंदुत्व, हिंदू राष्ट्राचा विचार, हिंदुत्व बाबतचा वैज्ञानिक दृष्टीकोन, सैनिकीकरणावरील भर यावर देशातील प्रत्येक विद्यापीठात अध्यापन असायला हवे. सावरकरांच्या विचारांचे वारसदार म्हणून सांगत जे लोक सत्तेत आले, त्यांनी तरी सावरकरांचा काय सन्मान केला? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. फक्त राहूल गांधी यांना दोष देऊन काय उपयोग आहे, घरभेद्यांनीच सावरकरांचा सर्वात जास्त अपमान केला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र सामाना अग्रलेखातून भाजपचा समाचार घेतला गेला आहे.

 

काँग्रेसने सावरकरांचा खुळखुळा केला आहे आणि भाजपने सावरकरांचे खेळणे केले आहे. राहूल गांधी यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस आज आम्हाला जाब विचारत आहेत. मुळात सर्व सत्ता हाताशी असून देखील त्यांनी सावरकरांचा सन्मान केला नाही, त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असे सामनातून म्हंटले आहे.

 

भाजपला अद्याप सावरकर कळाले नाहीत. सावरकरांच्या सन्मानार्थ दिल्लीतील मोदी सरकारने
(Modi Government) काय केले? सावरकरांचा भारतरत्न (Bharat Ratna) देऊन सन्मान करावा,
अशी मागणी शिवसेना गेली अनेक वर्षे करत आहे. परंतु अद्याप देखील मोदी सरकारला ते जमले नाही.
त्यामुळे सावरकर हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तोंडी लावायला आणि चघळायचा विषय झाला आहे,
असा मोठा आरोप शिवसेनेने सामनातून केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Swatantra Veer Savarkar | saamana editorial shivsena attacks bjp over rahul gandhi statement savarkar get a stipend british

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | नाना पाटेकरांनी विचारला प्रश्न, समान नागरी कायदा येईल का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर

Jayant Patil | भाजपावर जयंत पाटलांचा घणाघात, म्हणाले – भाजप सत्तेविना राहू शकत नाही, पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली

Amol Mitkari | बाळासाहेबांच्या नावाने चिन्ह मागण्यापेक्षा तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने चिन्ह मागा – अमोल मिटकरी

 

Related Posts