IMPIMP

Devendra Fadnavis | नाना पाटेकरांनी विचारला प्रश्न, समान नागरी कायदा येईल का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर

by nagesh
Devendra Fadnavis | will there be a uniform civil law devendra fadnavis clear answer to nana patekars question

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – समान नागरी कायदा (Uniform Civil Law) येईल का? असा थेट प्रश्न अभिनेते नाना पाटेकर (Actor Nana Patekar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला. यावर फडणवीस यांनी तो कायदा महाराष्ट्रात येईल असे स्पष्ट उत्तर दिले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. यावेळी फडणवीस बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

समान नागरी कायद्यासंदर्भात नाना पाटेकर यांनी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, समान नागरी कायदा आपल्या संविधानाने (Constitution) डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी (Directive Principles of State Policy) मध्ये सगळ्या राज्यांवर जबाबदारीच टाकली आहे. संविधानानेच सगळ्या राज्यांवर ही जबाबदारी टाकली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री इथे आहेत, गोवा एकमेव राज्य आहे जिथे समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. आता, उत्तराखंडमध्येही येत आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोक समान नागरी कायदा म्हटल्यावर त्याचे चुकीचे अर्थ लोकांमध्ये जाऊन सांगतात. आता, समान नागरी कायदा आला म्हणजे तुमचे आरक्षण जाणार आहे, मग शेड्युल कास्टला आरक्षण (Scheduled Caste Reservation) मिळणार नाही. इत्यादी… पण, काही संबंध नाही.

 

समाना नागरी कायद्यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, समान नागरी कायद्याचा अर्थ एवढाच आहे की,
आमचे जन्माचे कायदे (Laws of Birth) वेगळे आहेत, लग्नाचे कायदे (Laws of Marriage) वेगळे आहेत,
सबकेशनचे कायदे (Laws of Subcession) वेगळे आहेत. सगळ्या प्रकारचे वेगवेगळे कायदे आहेत.

 

ते म्हणाले, एक देश, एक समाज, एक कायदा.. अशाप्रकारे हा समान नागरी कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अपेक्षित होता.
म्हणूनच संविधानात त्यांनी लिहिले आहे की, राज्य हा प्रयत्न करेल की समान नागरी कायदा आला पाहिजे.
अजून आपण आणू शकलो नाहीत. पण, येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Devendra Fadnavis | will there be a uniform civil law devendra fadnavis clear answer to nana patekars question

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | भाजपावर जयंत पाटलांचा घणाघात, म्हणाले – भाजप सत्तेविना राहू शकत नाही, पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली

Andheri East by-Election | ऋतुजा लटके यांना शिंदे गटात पळविण्याचा प्रयत्न? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले

Amol Mitkari | बाळासाहेबांच्या नावाने चिन्ह मागण्यापेक्षा तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने चिन्ह मागा – अमोल मिटकरी

 

Related Posts