Symbolic Helmet Day In Pune | पुण्यात उद्या ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’; वाहतूक पोलीस कारवाई, जनजागृती करणार

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Symbolic Helmet Day In Pune | रस्त्यावर जागोजागी उभे राहून दुचाकीस्वारांना चौकात अडवून वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) हेल्मेटसक्तीची कारवाई करत असत. त्याला पुण्यात विरोध झाल्याने आता चौकातील कारवाई बंद झाली. फक्त सीसीटीव्हीद्वारे सध्या हेल्मेट सक्तीची कारवाई केली जात आहे. बुधवारी (दि. 24२४ मे) पुण्यात ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ (Symbolic Helmet Day In Pune) साजरा करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयाबाहेर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची जनजागृती करण्याबरोबरच कारवाई करण्यात येणार आहे.
रस्त्यावरील वाढत्या अपघातात दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश असल्याने जिल्हाधिकारी राजेश देशमुख
(Collector Rajesh Deshmukh) यांनी हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृतीसाठी 24 मे रोजी
‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी सर्वप्रथम सर्व शासकीय अधिकारी,
कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Pune Traffic Branch DCP Vijayakumar Magar)
यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सर्व प्रथम सर्व शासकीय कार्यालयात
येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी जनजागृती (Public Awareness)
करण्यात येईल. तसेच विना हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यासाठी सध्या असलेल्या वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची शासकीय कार्यालयाच्या परिसरात नेमणूक करण्यात आली आहे.
Web Title : Symbolic Helmet Day In Pune ‘Symbolic Helmet Day’ tomorrow in Pune;
Traffic police will take action and create public awareness
- Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा;
क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी, अजित वाडेकर क्रिकेट अॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !! - Pune PMC Property Tax | मिळकत करातील 40 टक्के सवलतीला कायदेशीर मान्यता देण्यासाठीचा मसुदा तयार;
महापालिका मुख्यसभेच्या मान्यतेनंतर राज्य शासनाला पाठविणार
Comments are closed.