IMPIMP

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!

by nagesh
Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Cup’ Championship Under 13 Boys Cricket Tournament; Cricket Next Academy, Ajit Wadekar Cricket Academy teams fight for the title !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament) १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी आणि अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी अनुक्रमे नाशिक जिमखाना आणि ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत श्रवण देसाई याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघाने नाशिक जिमखाना संघाचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना नाशिक जिमखाना संघाला २५ षटकात केवळ ९९ धावा जमविता आल्या. श्रेयस हेकारे याने ७० चेंडूत ६ चौकारांसह ५५ धावांची एकहाती खेळी केली. श्रवण देसाई याने १८ धावात ४ गडी बाद करत सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने १५.१ षटकात व २ गडी गमवून पूर्ण केले. सम्यक ओस्वाल याने ४० धावांची तर, युग सोनिग्रा याने नाबाद २९ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.

अलंकार पारवे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा
८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २५
षटकामध्ये १३५ धावांचे आव्हान उभे केले. कर्णधार आर्य कुमावत याने ५५ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ६२
धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अजित वाडेकरच्या अलंकार पारवे याने १७ धावात २ गडी बाद केले.
हे आव्हान अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २२.४ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले.
अलंकार पारवे याने ५२ चेंडूमध्ये १० चौकारांसह ५५ धावांची खेळी केली. श्रवण व्हावळ (नाबाद २८ धावा) आणि
शौर्य कोंडे (२४ धावा) यांनीही दुसर्‍या बाजूने उत्तम साथ देत संघाला विजयी केले. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः

नाशिक जिमखानाः २५ षटकात ७ गडी बाद ९९ धावा (श्रेयस हेकारे ५५ (७०, ६ चौकार), श्री बोंबळे १२,
श्रवण देसाई ४-१८) पराभूत वि. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः १५.१ षटकात २ गडी बाद १०० धावा
(सम्यक ओस्वाल ४०, युग सोनिग्रा नाबाद २९, राज कोठावळे १-१०); सामनावीरः श्रवण देसाई;

ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ८ गडी बाद १३५ धावा (आर्य कुमावत ६२ (५५, ११ चौकार),
अनवय कावणकर १४, अलंकार पारवे २-१७) पराभूत वि. अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २२.४ षटकात २ गडी बाद
१३६ धावा (अलंकार पारवे ५५ (५२, १० चौकार), श्रवण व्हावळ नाबाद २८, शौर्य कोंडे २४, अनवय कावणकर १-१५);
सामनावीरः अलंकार पारवे.

Web Title : Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Cup’ Championship Under 13 Boys Cricket Tournament; Cricket Next Academy, Ajit Wadekar Cricket Academy teams fight for the title !!

Related Posts