IMPIMP

Tata Airbus Project | ‘मला तोंड उघडायला लावू नका’, प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरे आणि देसाईंना थेट आयटी आणि सीबीआयची धमकी

by nagesh
Tata Airbus Project | bjp prasad lad allegations on shivsena thackeray faction subhash deasai ober airbus tata project gujarat

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ‘वेदांता-फॉक्सकॉन’ (Vedanta-Foxconn) नंतर आता ‘टाटा एअरबस’चा (Tata Airbus Project) हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा आणि नागपुरमध्ये होणारा सुमारे 22 हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावरून महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटत आहेत. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) धारेवर धरले आहे. मात्र, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेला तेव्हाही शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जबाबदार धरत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता, शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी बोलल्यानंतर चित्र स्पष्ट झाले होते. (Tata Airbus Project)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता दुसरा प्रकल्प गेल्यानंतर सुद्धा शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा ठाकरेंनाच जबाबदार धरत आहे. आता भाजपा आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी तर याचे खापर तत्कालीन महाविकास आघाडीवर फोडत आयटी आणि सीबीआय कारवाईची धकमीच दिली आहे.

 

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रसाद लाड म्हणाले, महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. 21 सप्टेंबर 2021 मध्येच एअरबस- टाटा प्रकल्प (Tata Airbus Project) परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचे आहे. सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी याचे उत्तर दिले पाहिजे.

 

प्रसाद लाड यांनी म्हटले की, येणार्‍या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवे.सुभाष देसाई (Subhash Desai) कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचे सांगितले जात होते? या गोष्टी जर आम्ही काढत बसलो तर मोठे प्रकरण समोर येईल. किती उद्योगांकडून किती पैसे घेतले, फाईल कशा फिरल्या याची सर्व माहिती प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) आणि सीबीआयकडे (CBI) आहे. सुभाष देसाई यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रसाद लाड पुढे म्हणाले, आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. सुभाष देसाईच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीबद्दल हे सिद्ध झाले आहे. नवाब मलिक (Nawab Malik), अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. अनिल परब (Anil Parab) यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे पत्राचाळ प्रकरण आहे. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा वयाचा, अनुभवाचा आदर करतो. पण त्यांनी अशाप्रकारे शिंदे, फडणवीस यांच्यावर आरोप करण्याआधी आपल्या टोपलीखाली झाकून पाहावे. वेळ पडल्यास पुरावे समोर आणू.

 

प्रसाद लाड आणि इतर भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले,
प्रकल्प वर्षभरापूर्वी गेला असेल तर माध्यमांनी आज का बातम्या दिल्या?
दोन दिवसांनी भूमीपूजन होणार असून ही तारीख आम्ही दिलेली नाही.
हेच खरे असून यापासून पळ काढता येणार नाही. प्रसाद लाड यांना उत्तर देताना ते म्हणाले, खबरदार,
असले आरोप सहन करणार नाही. ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावेत.
किती बालीशपणे बोलत आहेत.

 

भारतीय हवाई दलासाठी सी-295 मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील
बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार (Defense Secretary Ajay Kumar)
यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Tata Airbus Project | bjp prasad lad allegations on shivsena thackeray faction subhash deasai ober airbus tata project gujarat

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा रवी राणांना संतप्त सवाल, मग मला कुणी पैसे दिले? एकनाथ शिंदेंनी की देवेंद्र फडणवीसांनी?

Bachchu Kadu | माझे राजकारण चुलीत गेले तरी बेहत्तर, आता माघार नाही – बच्चू कडू

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ‘त्या’ वाक्याची उडवली खिल्ली

 

Related Posts