IMPIMP

Bachchu Kadu | माझे राजकारण चुलीत गेले तरी बेहत्तर, आता माघार नाही – बच्चू कडू

by nagesh
  MLA Bachchu Kadu | bacchu kadu reaction on sanjay raut statement on anandacha shidha

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन  शिंदे यांच्या गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हट्टाला पेटले आहेत. अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी त्यांच्यावर गुवाहाटीला जाऊन 50 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ते संतापले आहेत आणि त्यांनी पक्षाला म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) वेगळा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी राणा आणि शिंदे फडणवीसांना 1 नोव्हेंबरची मुदत दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बच्चू कडू एका टीव्ही वाहीनीसोबत संवाद साधत होते, यावेळी ते म्हणाले, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. तरी देखील राणा माझ्यावर पैसे घेतल्याचे आरोप करत आहेत.
या आरोपांचे त्यांना उत्तर द्यावेच लागेल. 1 तारखेपर्यंत त्यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे सादर करावेत.
आज जर का मी शांत राहिलो, तर लोक म्हणतील खरेच आम्ही खोके घेतले.
रवी राणा काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादीसोबत (NCP) निवडून आल्यानंतर त्यांच्या पत्नीने भाजपाला
(BJP) पाठिंबा दिला होता. तेव्हा तो पाठिंबा पैसे घेऊन दिला होता का? सगळे पैसे घेऊनच पाठिंबा देतात असे राजकारणात काही नसते. त्यामागे वेळोवेळी वेगवेगळी कारणे असतात. आम्ही आमच्या मतदारसंघाचा विचार केला, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांचा विचार केला म्हणून शिंदे फडणवीसांना पाठिंबा दिला.

 

तसेच उद्या या सगळ्या राजकारणात माझी राख झाली, तरी माझ्याविरोधात झालेल्या आरोपांबद्दल मी पेटणार
आणि बोलणार आहे. मला मंत्रीपदाचा मोह नाही. मी एवढा कच्चा माणूस नाही. मंत्रीपद काय ब्रह्मदेव पाठवतो का?
माणूसच देतो. लोकांनी दिलेली आमदारकी मंत्रीपदापेक्षा मला लाख मोलाची आहे.
मी नागडा होईन, मला त्याची फिकीर नाही. बच्चू कडूचे (Bachchu Kadu) राजकारण चुलीत गेले तरी बेहत्तर.
आता आम्हाला राजकारण सोडावे लागले तरी बेहत्तर. तुम्ही असे आरोप करत असाल,
तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत.
आम्ही तुमच्यात पण नांगर घालून टाकू, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bachchu Kadu | Even if my politics goes into the oven, it’s better, there is no going back now – Bachu Kadu

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ‘त्या’ वाक्याची उडवली खिल्ली

Aaditya Thackeray | गेल्या तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी दहिहंडी, गणपती मंडळे आणि फोडाफोडीशिवाय काय केले? – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray – Pune PMC | पावसाळी परिस्थितीवर दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी पुणे शहराचा कंटूर सर्व्हे करा : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

 

Related Posts