IMPIMP

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा रवी राणांना संतप्त सवाल, मग मला कुणी पैसे दिले? एकनाथ शिंदेंनी की देवेंद्र फडणवीसांनी?

by nagesh
MLA Ravi Rana | mla ravi rana criticized bachchu kadu on dispute maharashtra news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि शिंदे गटातील (Shinde Group) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पैसे घेऊन बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावर बच्चू कडूंनी एक तारखेचा अल्टिमेटमही राणा यांना दिला असून या काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनीच भूमिका स्पष्ट करावी, असे कडूंनी म्हटले आहे. आज बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रवी राणा यांना सूचक इशारा दिला असून यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुद्धा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बच्चू कडू म्हणाले, रवी राणांच्या आरोपांमुळे सगळेच अडचणीत येतील. आरोप माझ्या एकट्यावर नाही. रवी राणा म्हणाले की बच्चू कडूंनी खोके घेऊन पाठिंबा दिला. पण तो आरोप सर्वांवर आहे. मी पैसे घेतले, तर मग ते कुणी दिले? शिंदेंनी की फडणवीसांनी? हे सिद्ध करावे लागेल.

 

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटले की, हे सगळे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापर्यंत जातील. हे सरकार पैसे देऊन स्थापन केले का? 50 आमदारांना पैसे देऊन बोलावले होते का? त्यामुळे हा वाद माझ्यापुरता मर्यादित नाही. तो सगळ्यांना अडचणीत आणणारा विषय आहे. मला काय पाकिस्तानमधल्या लोकांनी पैसे दिले नसतील ना? दिले असतील, तर यांनीच दिले असतील.

 

यावेळी बच्चू कडू यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे. नाहीतर मी त्यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवणार. या आरोपांची ईडी चौकशी झालीच पाहिजे. मला आनंदच होईल. मी त्या चौकशीला सामोरा जाण्यासाठी कधीही तयार आहे. चौकशी झाली तर दूध का दूध, पानी का पानी होईल. हा डाग कधीतरी पुसला गेला पाहिजे ना.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ते पुढे म्हणाले, वरिष्ठांनी यावर समोर यायला हवे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी यावर भूमिका मांडायला हवी. नाहीतर आम्ही आमचे काम करू. हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वच धोक्यात येत असेल, तर या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात.

 

दरम्यान, रवी राणा यांनी म्हटले होते की, बच्चू कडूंचा संताप म्हणजे फुसका बार आहे.
यावर बच्चू कडू यांनी म्हटले होते की, हा फुसका बार आहे की बॉम्ब आहे ते आपण एक तारखेला दाखवू ना.
कसा कुणाच्या खाली बॉम्ब लावायचा हे बच्चू कडूला चांगलंच माहिती आहे. एक तारखेलाच त्याचा परिणाम दिसेल.
सगळे फटाके एक तारखेला वाजतील.

 

 

Web Title :- Bachchu Kadu | bachchu kadu slams ravi rana allegations targets eknath shinde devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu | माझे राजकारण चुलीत गेले तरी बेहत्तर, आता माघार नाही – बच्चू कडू

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ‘त्या’ वाक्याची उडवली खिल्ली

Aaditya Thackeray | गेल्या तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी दहिहंडी, गणपती मंडळे आणि फोडाफोडीशिवाय काय केले? – आदित्य ठाकरे

 

Related Posts