IMPIMP

Tata Group | टाटा समुहाच्या टीसीएसला बंपर ‘नफा’ ! गुंतवणुकदारही मालामाल, 40% रिटर्ननंतर मिळणार 700% ‘लाभांश’

by nagesh
TCS | ratan tata tcs suffered a loss of rs 1 41 lakh crore in 7 business days investors also worried

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Tata Group | टाटा समुहाची (Tata Group) आयटी कंपनी टीसीएसने शुक्रवारी सप्टेंबर तिमाहीचा निकाल (TCS Financial Result) जारी केला. कंपनीला या तिमाहीत सुमारे 10 हजार कोटीचा मोठा नफा (Net Profit) झाला आहे. कंपनीच्या शेयरधारकांना (Shareholders) सुद्धा यातून मोठा फायदा होणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दुहेरी खुशखबर ठरली

टीसीएस (TCS) आपल्या शेयरधारकांना लवकरच 700 टक्के लाभांश (Dividend) देणार आहे.
ही टाटा (Tata) साठी दुहेरी खुशखबर ठरली आहे.
यापूर्वी एयर इंडिया (Air India) साठी टाटाच्या बोलीला सरकारने मंजूरी दिली, ज्याबाबत रतन टाटा (Ratan Tata) यांनी सुद्धा ट्विट केले.

सुमारे 29 टक्के वाढला TCS Net Profit

टाटा समुहाची शेयर बाजारात लिस्टेड सर्वात मोठी कंपनी टीसीएसने शुक्रवारी बीएसई (BSE) ला सांगितले की,
सप्टेंबर 2021 मध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत त्यांचा नफा 9,624 कोटी रुपयांवर पोहचला. वर्षभरापूर्वी म्हणजे सप्टेंबर 2020 तिमाहीत हा नफा 7,475 कोटी रुपये होता.
अशाप्रकारे वार्षिक आधारावर टीसीएसचा नफा 28.74 टक्के वाढला आहे.

वर्षभरात 40 टक्के वाढ

कंपनीच्या (Tata Group) कामगिरीमुळे शेयरधारकांना दुप्पट लाभ झाला आहे.
आज टीसीएसचा शेयर 3935 रुपयांवर बंद झाला. व्यवहाराच्या दरम्यान हा एकवेळ 52 आठवड्यांचा उच्च स्तर 3989.90 रुपयांवर पोहचला होता.
कंपनीचे मार्केट कॅप 14.55 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.

वर्षभरापूर्वी म्हणजे 8 ऑक्टोबर 2020 ला टीसीएसचा एक शेयर 2,824.80 रुपयांचा होता.
आज याची किंमत 3,935.30 रुपये आहे. म्हणजे वर्षभरात कंपनीच्या शेयरधारकांना सुमारे 40 टक्केचा फायदा झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

वर्षभरात दुसर्‍यांदा लाभांश

टीसीएसच्या शेयरधारकांना दुसरा फायदा लाभांशद्वारे झाला आहे. कंपनी या आर्थिक वर्षात दुसर्‍यांदा अंतरिम लाभांश देणार आहे.
कंपनी 700 टक्के लाभांश देणार आहे. म्हणजे एक रुपयांच्या शंयरवर सात सात रुपयांचा लाभांश टीसीएसच्या शेयरधारकांना मिळेल.

यासाठी 19 ऑक्टोबर 2021 ला रेकॉर्ड डेट बनवण्यात आली आहे. 19 ऑक्टोबर 2021 च्या दिवशी ज्यांच्या नावावर रजिस्टर ऑफ मेंबर्स ऑफ द कंपनी किंवा जे डिपॉझिटरीजच्या रेकॉर्डमध्ये असतील.
त्यांना कंपनीचा लाभांश मिळेल. 3 नोव्हेंबरला हा लाभांश दिला जाईल.

 

30 टक्के वाढला इन्कम

कंपनीचे ऑपरेटिंग इन्कम सुद्धा वर्षभरात सुमारे 30 टक्के वाढले आहे. सप्टेंबर 2020 तिमाहीत तो 9,123 कोटी रुपये होता.
तर सप्टेंबर 2021 तिमाहीत तो वाढून 11,858 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

टीसीएसच्या महसुलात सुमारे 17 टक्के वाढ झाली आहे. टीसीएसचा एकुण महसुल सप्टेंबर 2020 मध्ये समाप्त तिमाहीत 40,135 कोटी रुपये होता.
तो वर्षभरानंतर वाढून 46,867 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

 

Web Title : Tata Group | tcs of tata group to give 700 percent dividend tcs financial result came as double good news for ratan tata

 

हे देखील वाचा :

BMC Election | मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना भाजपासह काँग्रेस-राष्ट्रवादीला देखील देणार ‘टक्कर’

Pune Crime | अबब ! नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमधील ‘खजिन्या’चा पर्दाफाश; हिरे, सोनं-चांदी अन् रोकड…

Sharad Pawar | आगामी निवडणूकांच्या संदर्भात शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

 

Related Posts