IMPIMP

Teachers and Graduate Constituencies Election | विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, 5 जागांसाठी प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला

by nagesh
Teachers and Graduate Constituencies Election | maharashtra mlc election schedule declared for two graduates and three teachers constituency in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Teachers and Graduate Constituencies Election | राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर आणि
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदारसंघाची तर नाशिक, अमरावती पदवीधर
मतदारसंघाची निवडणूक (Teachers and Graduate Constituencies Election) जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या
निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 ला मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. याबाबत 5 जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाणार
आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पदवीधरचे दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Teachers and Graduate Constituencies Election) तीन जागांसाठी 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूक होणार आहे.

 

नाशिक मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे (BJP) रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार

काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे स्नेही आणि युवक
काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार आहेत.
त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळवला होता.
त्यामुळे शिक्षक मतदारसंघात देखील विजय मिळवण्यासाठी राष्ट्रावदीचा प्रयत्न असेल.
तर अमरावती पदवीधरमध्ये भाजपने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच रणजीत पाटील यांना
उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Teachers and Graduate Constituencies Election | maharashtra mlc election schedule declared for two graduates and three teachers constituency in maharashtra

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘बाळासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर आमचा अधिकार’, शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे विधान!

Uddhav Thackeray | भ्रष्टाचाराचे आरोप हे केवळ शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच का होत आहेत, याचा त्यांनी विचार करावा; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटातील मंत्र्यांना सूचक इशारा…

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंचा वाटीएवढा ग्रुप राहिलाय, आता तरी त्यांनी हट्ट सोडला पाहिजे – नितेश राणे

 

Related Posts