IMPIMP

Uddhav Thackeray | भ्रष्टाचाराचे आरोप हे केवळ शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच का होत आहेत, याचा त्यांनी विचार करावा; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटातील मंत्र्यांना सूचक इशारा…

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray comment on allegations of corruption on shinde faction minister

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे. यादरम्यान विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून चांगलेच घेरले आहे. यात विशेष बाब ही की आत्तापर्यंत अधिवेशनात आरोप झालेले मंत्री हे सर्व शिंदे गटाचेच आहेत. यात एकाही भाजपच्या मंत्र्याचा समावेश नाही. त्याबाबत भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील मंत्र्यांना एक सूचक इशारा दिला आहे. (Uddhav Thackeray)

 

या विषयावर भाष्य करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ‘सर्व भ्रष्टाचाराचे आरोप हे फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच का होत आहेत हा विचार शिंदे गटातील मंत्र्यांनीच करायला हवा. ही प्रकरणं नेमकी कुठून बाहेर येत आहेत आणि कशी बाहेर येत आहेत यावर शिंदे गटाने विचार करावा. आणि याबाबतचा शोध त्यांनीच घ्यावा असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना दिला आहे.’

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांचे आपण राजीनामा घेतल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप माझ्या कार्यकाळात देखील झाले.
मात्र याचा अर्थ माझा त्याला पाठिंबा होता असा नाही. जेव्हा आरोप झाले तेव्हा मी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला. तो मंत्री तेव्हा माझ्या शिवसेनेसोबत होता. आत्ता कुठे आहेत मला माहित नाही. आत्ताही त्यांचे प्रकरण बाहेर आले आहे. आता एक एक प्रकरण बाहेर येत आहे. तसेच शिंदे गटाने भाजप गाडत आहे की आधार देत आहे याचा देखील विचार करावा. असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिला.

 

उद्धव ठाकरेंच्या या सूचनावजा इशाऱ्याने मात्र राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray comment on allegations of corruption on shinde faction minister

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंचा वाटीएवढा ग्रुप राहिलाय, आता तरी त्यांनी हट्ट सोडला पाहिजे – नितेश राणे

Ajit Pawar | पुणे विकासावर अजितदादांची सर्व पक्षीयांना साद; म्हणाले…

Devendra Fadnavis | ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!, ‘स्वधार’ सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्याची फडणवीसांची घोषणा

Shruti Haasan | श्रुती हासनने सिनेसृष्टी बद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली “मी कधीही दिखावा केला नाही…”

 

Related Posts