IMPIMP

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंचा वाटीएवढा ग्रुप राहिलाय, आता तरी त्यांनी हट्ट सोडला पाहिजे – नितेश राणे

by nagesh
 BJP MLA Nitesh Rane | nitesh rane attacks uddhav thackeray over anil parab mhada home

सरकारसत्ता ऑनलाईन Maharashtra Politics | शिवसेनेच्या शिंदे गटाने विधिमंडळातील सेनेचे जुने कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या कार्यालयावर देखील दावा केला. त्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत प्रचंड राडा झाला. यानंतर महापालिका आयुक्तांनी सर्व पक्षांची कार्यालये सील करण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकरणानंतर भाजपच्या आमदाराने शिवसेना ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे. (Maharashtra Politics)

 

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंची या सर्व प्रकरणावरून खिल्ली उडवली आहे. मुंबई महापालिकेतील ते शिवसेनेचे कार्यालय हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. आणि त्यांचा अधिकार ते घेणार. तसेच जे बाळासाहेबांचे आहे ते सर्व एकनाथ शिंदेंचे आहे. आता उद्धव यांचा वाटी एवढा ग्रुप राहिलाय. तेव्हा आता तरी त्यांनी हट्ट सोडायला पाहिजे. त्याचप्रमाणे जिथे बाळासाहेब बसायचे तिथे एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. जे उरलेले उद्धव ठाकरेंसोबत कार्यालयात गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील आमदार नितेश राणे यांनी केली. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमदार नितेश राणेंच्या या वक्तव्यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, ‘आमचे हे वाटीभर असलेले शिवसैनिकच नाकात पाणी आणतील.., तसेच कार्यालयावरून पालिकेत झालेल्या गदारोळावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ती घटना हा दादागिरीचा प्रकार आहे. त्यांची ही मस्ती सत्तेच्या जोरावर सुरू आहे. आणि ती जनतेनेच उतरवली पाहिजे. शिंदे गटास कार्यालय असणे वावगे नाही. त्यामुळे त्यांना जर हवे होते तर दुसरे कार्यालय बघायचे. असे देखील दानवे म्हणाले. (Maharashtra Politics)

 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
ते म्हणाले की, भाजपसारखाच शिंदे गटाला देखील अहंकार चढला आहे.
दुसऱ्याच्या घरात जाऊन जर त्याचे सामान बाहेर फेकले तर कसे वाटेल? असेच सध्या ठाकरे गटाला वाटत आहे.
मात्र सध्या शिंदे गटाकडून अतिक्रमण सुरू आहे. अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
(Maharashtra Politics)

 

Web Title :- Maharashtra Politics | bjp leader mla nitesh rane criticised shivsena thackeray group chief uddhav thackeray over bmc party office clashes

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | पुणे विकासावर अजितदादांची सर्व पक्षीयांना साद; म्हणाले…

Devendra Fadnavis | ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!, ‘स्वधार’ सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्याची फडणवीसांची घोषणा

Uddhav Thackeray | त्यांची नजर वाईट आहे, त्यामुळे आरएसएसने काळजी घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालय भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य…

 

Related Posts