IMPIMP

Tuljapur Accident | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या क्रूझर गाडीला भीषण अपघात; एकजण जागीच ठार, 11 गंभीर जखमी

by nagesh
Jalna Crime News | hair braid stuck in threshing machine woman farmer dies

तुळजापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Tuljapur Accident | जालन्याहून तुळजापूर (Tuljapur Accident) याठिकाणी तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या क्रूझर गाडीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शहरात वळण घेत असताना एका अज्ञात वाहनाने क्रूझरला पाठीमागून जोरात धडक दिली. या झालेल्या अपघातात एक भाविक जागीच ठार (Died) झाला. तर इतर, 11 जण गंभीर जखमी (11 seriously injured) झाले आहेत. ही घटना रात्री 3.30 च्या दरम्यान घडली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, जालना जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील 11 तरुण आणि घनसांगवी येथील 1 तरुण असे एकूण 12 जण पंढरपूरला देवदर्शनासाठी क्रूझरने जात होते. परंतु, वाटेत तुळजाभवानी देवीचं मंदिर असल्याने तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पंढरपूरकडे जाण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यामुळे तुळजापूरच्या दिशेने जात असताना तुळजापुर-सोलापूर महामार्गावर बार्शी रोड पुलावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पाठीमागून आलेल्या भरधाव गाडीने भाविकांच्या क्रूझर गाडीला जोरात धडक दिली. या झालेल्या भीषण अपघातात (Accident) एकजण ठार तर, 11 जण गंभीर जखमी झालेत. (Tuljapur Accident)

दरम्यान, या घटनेबाबत माहिती समजताच तुळजापूर पोलिस पथक (Tuljapur Police Squad) घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर मदतकार्य सुरु करण्यात आली. 11 जखमी भाविकांवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर,
त्यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Tuljapur Accident | terrible accident to devotees van 1 devotee died and 11 other injured crime in tuljapur of osmanabad district

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये मोठा परतावा ! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 32 लाख, जाणून घ्या

Sangli Crime | सांगलीतील धक्कादायक प्रकार ! कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं CA चा महिलेवर बलात्कार

Kubbra Sait | ‘सेक्रेड गेम्स्’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर फोटोशूट, पाण्यात स्वत:लाच किस करतानाचे फोटो झाले व्हायरल…

 

Related Posts