IMPIMP

Types Of Tax Notices | तुम्हाला पण आली आहे का Income Tax ची नोटिस? जाणून घ्या कसे देता येईल उत्तर

by nagesh
Old Income Tax Regime | old income tax regime with deductions must go said by revenue secretary tarun bajaj

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Types Of Tax Notices | प्राप्तीकर विभागाकडून (Income tax department) नोटीस मिळणे कुणालाच आवडत नाही? उलट असे होऊ नये असेच सर्वांना वाटते. परंतु प्राप्तीकर रिटर्न (ITR) भरताना तुमच्या उत्पन्नाची गणना करताना एक छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. यामुळे तुम्हाला प्राप्तीकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. ज्याला नोटीस मिळेल त्याने www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटला भेट देऊन उत्तर दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. (Types Of Tax Notices)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

साधारणपणे प्राप्तीकर रिटर्न भरताना लोक चुकीची माहिती देतात किंवा कर वाचवण्यासाठी जास्त नुकसान दाखवतात. अशा स्थितीत ज्यांच्यावर चुकीची माहिती भरल्याचा संशय असेल त्यांना विभाग नोटीस पाठवू शकतो. अशा नोटिशींबाबत जाणून घेवूयात…

 

1. कलम 139(9) अंतर्गत

सदोष रिटर्न (defective return) साठी कलम 139(9) अंतर्गत नोटीस पाठवली. आयटीआरमध्ये कोणतीही माहिती गहाळ असल्यास (माहिती दिलेली नसेल) किंवा आयटीआर फॉर्ममध्ये दिलेली माहिती आय-टी विभागाच्या डेटाशी जुळत नसल्यास ती सदोष मानली जाते.

 

या स्थितीत करदात्यांनी 15 दिवसांच्या आत उत्तर द्यावे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास आयटीआर नाकारला जाईल. विभागाने केलेल्या प्रश्नाला नीट उत्तरे द्यावीत, जेणेकरून समजण्यास अडचण येणार नाही.

 

2. कलम 143(1) अंतर्गत

ही एक माहितीपूर्ण (intimation) नोटीस आहे. जेव्हा जास्त कर भरला जातो आणि परतावा करदात्याला कळवला जातो
किंवा जेव्हा वास्तविक करापेक्षा कमी भरला जातो तेव्हा विभाग करदात्याला कर दायित्वांबद्दल माहिती देतो. (Types Of Tax Notices)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

3. कलम 143(1)(a) अंतर्गत

ही देखील एक माहितीपूर्ण नोटीस आहे. आयटीआर आणि फॉर्म 16 आणि फॉर्म 16A चे TDS प्रमाणपत्रामधील उत्पन्न,
सूट किंवा कपात यांच्यात कोणताही संबंध (exemption or deductions) नसेल ते पाठवले जाते.
याचा अर्थ करदात्याने आयटीआरमध्ये काहीतरी वेगळे भरले आहे आणि त्याचे टीडीएस प्रमाणपत्र वेगळे काहीतरी सांगत आहे.

 

4. कलम 142(1) अंतर्गत

जेव्हा ‘असेसिंग ऑफिसर’ (Assessing Officer) ला आयटीआरवर करदात्याकडून कोणतीही अतिरिक्त माहिती हवी असेल तेव्हा ही नोटीस दिली जाते.
करदात्याने कोणत्याही वर्षी आयटीआर दाखल केला नसला तरीही तो पाठविला जाऊ शकतो,
परंतु मागील वर्षांच्या आधारे, मूल्यांकन अधिकारी आयटीआर दाखल करण्याची मागणी करतात.
कलम 142(1) अंतर्गत नोटीसला उत्तर न दिल्यास 10,000 रुपये दंड किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते.

 

5. कलम 156 अन्वये

या कलमांतर्गत, आयटी विभाग मागणी नोटीस पाठवते. या नोटीसद्वारे, पेनल्टी, दंड किंवा कर मागितला जातो,
जो करदात्याला भरावा लागतो. नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत तुम्ही देय रक्कम भरली पाहिजे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

6. कलम 143(2) अंतर्गत

ही केवळ माहिती नाही, हा छाननी आदेश आहे, म्हणजे तपासाचा आदेश.
जेव्हा एखाद्याच्या ITR मध्ये उत्पन्न खूप कमी किंवा तोटा जास्त नोंदवला जात असल्याबद्दल विसंगती आढळते तेव्हा आयकर विभाग असा आदेश देतो.

 

Web Title :- Types Of Tax Notices | here is how you can respond to different types of tax notices

 

हे देखील वाचा :

Benefits Of Ghee In Hot Milk | थंडीच्या दिवसात ‘गरम’ दूधामध्ये तूप टाकून पिल्याने होईल मोठा फायदा अन् पळून जातील आजार, जाणून घ्या…

Income Tax Faceless Scheme | इनकम टॅक्स विभागाची नोटीस कधी आणि कुठे येऊ शकते, जाणून घ्या IT विभागानं दिली स्टेप बाय स्टेप माहिती

Ilenana D’Cruz | इलियानाचा पुन्हा एकदा पांढऱ्या बिकनीमध्ये बोल्ड जलवा, फोटोंनी लावली आग तर चाहते झाले घायाळ

 

Related Posts