IMPIMP

Uday Samant | विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढणार – मंत्री उदय सामंत यांची माहिती

by nagesh
Uday Samant | cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Uday Samant | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालयात (Schools And Colleges) शिक्षण व परीक्षा ऑनलाईनच्या (Online) माध्यमातून पार पडल्या. दरम्यान आता कोरोनाची परिस्थिती निंयत्रणात आल्याने सर्व परीक्षा ऑफलाईन (Offline) घेण्याचा निर्णय झाला. आता या ऑफलाईन परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी युवासेनेने केली होती. या दरम्यान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत (Uday Samant) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने (Offline Exams) परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला आहे.’

 

 

दरम्यान, यावर्षी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला होता. आता विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला आहे. याबाबत माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

 

Web Title :- Uday Samant | The time for offline exams of universities will increase Information of Minister Uday Samant

 

हे देखील वाचा :

Pune PMC School Teacher Demand | पुणे महापालिका शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल; राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा प्रशासनाला इशारा

Chitra Wagh | भाजप नेत्या चित्रा वाघ यांना शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्याकडून नोटीस

Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

Related Posts