IMPIMP

Chitra Wagh | भाजप नेत्या चित्रा वाघ यांना शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्याकडून नोटीस

by nagesh
Chitra Wagh | shivsena leader raghunath kuchik rape case notice to bjp leader chitra wagh pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेना नेते (Shivsena Leader) रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील (Raghunath Kuchik Rape Case) मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्या (BJP Leader) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना रघुनाथ कुचिक यांनी नोटीस (Notice) बजावली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पाठवलेली नोटीस त्यांना आज सकाळी मिळाली आहे. वाघ यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या गुन्ह्यात न्यायालयाने मला अटकपूर्व जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असून चित्रा वाघ या माझी बदनामी (Defamation) करत आहेत. त्यांनी माझ्या अब्रुनुकसानीची भरपाई द्यावी. तसेच यासंदर्भात आपण वाघ यांच्याविरुद्ध दिवाणी (Civil) व फौजदारी दावा (Criminal Claims) दाखल करणार आहोत, असे कुचिक यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये नमूद केले आहे. कुचिक यांनी ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर (Senior Advocate Harshad Nimbalkar) यांच्या मार्फत ही नोटीस पाठवली आहे.

 

 

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करुन माहिती देताना लिहिले आहे की, शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कार पिडीतेने काल माझ्यावर आरोप केले की चित्रा वाघ यांनीच हे सगळं घडवून आणलं.. आणि आज सकाळीच कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली. तर दुसरीकडे चित्रा वाघवर कसा गुन्हा (FIR) दाखल करता येईल यावर खलबतं सुरु आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग नाही का ? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देऊन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फोट या प्रकरणातील तरुणीने मंगळवारी (दि.12) केला. एवढेच नाही तर आजपर्यंत सगळे जबाब वाघ यांच्या सांगण्यावरून नोंदवल्याचे पीडित मुलीने म्हटले आहे.

 

 

Web Title :- Chitra Wagh | shivsena leader raghunath kuchik rape case notice to bjp leader chitra wagh pune

 

हे देखील वाचा :

Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

MNS Avinash Jadhav | ‘…तर मग मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा’; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक !

Modi Government | मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट ! गृहकर्जावरील व्याजदर केला कमी

Pune Crime | 2 डॉक्टरांना धमकावून 30 लाखाची खंडणी घेताना मंगेश कांचनला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

 

Related Posts