IMPIMP

Uday Samant | वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार, पंतप्रधानांचे आश्वासन, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती (व्हिडिओ)

by nagesh
Uday Samant | as no one has come with a power dont show it off says uday samant

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यात राजकारण तापल्याचे पहायला मिळत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका केली आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामगे मविआ जबाबदार असल्याचे उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. तसेच ही कंपनी महाराष्ट्रात येण्यासाठी गेले आठ महिने प्रयत्न करत होती मात्र आधीच्या सरकारने त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

https://fb.watch/fxrk8nZq2f/

 

उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या प्रकरणावर एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदी यांनी फोनवर म्हटल्याची माहिती सामंत यांनी दिली.

 

उदय सामंत पुढे म्हणाले, राज्यात चांगलं काय झालं तर ते त्यांच्या मुळे झालं, वाईट झालं तर शिंदे-फडणवीस
सरकारमुळे (Shinde-Fadnavis Government) होतं, राजकारणातील अशा वाईट प्रवृत्तीचा मी निषेध करतो,
असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजून काही या प्रकल्पाला देता येईल का याबाबत अनेक बैठका त्यांनी घेतल्या,
आणि फडणवीस अनिल अग्रवाल (Anil Aggarwal) यांच्याशी बोलले होते.
त्यांनी अग्रवाल यांना प्रकल्पासाठी लागेल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र मागील 7-8 महिन्यात आलेल्या अनुभवामुळे कदाचीत त्यांनी हा निर्णय घेतला असावा,
असं उदय सामंत यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uday Samant | vedanta Foxconn  project gujarat despite higher offers uday samant explained

 

हे देखील वाचा :

Maharashtra Municipal Election | शिंदे गटासोबत युती करणार?, मनसेचं मोठं विधान

Vedanta Foxconn Project | पुण्याची जागा योग्य असल्याचे अहवालात नमूद असतानाही प्रकल्प गुजरातला गेला; Foxconn Project चा अहवाल फुटला

Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना

 

Related Posts