IMPIMP

Vedanta Foxconn Project | पुण्याची जागा योग्य असल्याचे अहवालात नमूद असतानाही प्रकल्प गुजरातला गेला; Foxconn Project चा अहवाल फुटला

by nagesh
Vedanta Foxconn Project | vedanta foxconn report mentions that the site of talegaon pune in maharashtra is suitable for the project after that project goes in gujrat

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा (Vedanta Foxconn Project) 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमी कंडक्टर निर्मितीचा (Semiconductor Manufacturing) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्याबाबत वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप (Vedanta Foxconn Project) आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या कंपनीसोबत चर्चा केली होती. मात्र त्यानंतर मंगळवारी कंपनीने अचानक हा प्रकल्प गुजरातला (Gujarat) होणार असल्याचे जाहीर केले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत. मात्र, याचदरम्याने एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

 

एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तळेगावची साईट योग्य असल्याचा उल्लेख वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.
तर गुजरातमधील ‘ढोलेरा’ची साईट प्रकल्पासाठी (Vedanta Foxconn Project) अयोग्य असल्याचाही उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या प्रकल्पाबाबत एक सर्व्हे केला होता.
त्यावेळी त्यांनी जागेबाबत निरिक्षण करुन अहवाल सादर केला होता. यामध्ये प्रकल्पाबाबत मतं मांडण्यात आली होती.

 

सेमी कंडक्टर धोरण (Semiconductor Policy) असलेले एकमेव राज्य असल्याने गुजरातला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे.
आणि याच एका कारणामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरातनं सेमी कंडक्टर धोरण बनवलं, असं धोरण बनवणारं देशातील हे एकमेव राज्य आहे.
या धोरणांतर्गत गुंतवणूक यावी यासाठी स्टेट इलेक्ट्रॉनिक मिशन स्थापन (State Electronic Mission) केलं.
या मिशन अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना ज्या सुविधा द्यायच्या त्याच्या मान्यता बजेटमध्ये घेतल्या.
गुजरात सरकार फेब्रुवारी पासून सेमी कंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vedanta Foxconn Project | vedanta foxconn report mentions that the site of talegaon pune in maharashtra is suitable for the project after that project goes in gujrat

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना

Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?

 

Related Posts