IMPIMP

Uday Samant | ‘प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख, पण…’, उद्योगमंत्री उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

by nagesh
Uday Samant | cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन वेदांता (Vedanta) आणि फॉक्सकॉन (Foxconn) या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुक (Investment) करणार होत्या.
परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या दोन कंपन्या गुजरातमध्ये गेल्या. यावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि सुभाष देसाई (Subhash
Desai) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला उद्योगमंत्री
(Industries Minister) उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष
करताना महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आधी द्यावे, असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले. तसेच वेदांताची गुंतवणूक गेल्यानंतर नाणार रिफायनरीबाबत (Nanar Refinery) त्यांनी भीती व्यक्त केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काही दिवसांपूर्वीच राज्यात शिवसेना-भाजप युतीचे (Shiv Sena-BJP Alliance) सरकार आले. तेव्हा फॉक्सकॉन वेदांताने सांगितले की, गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक चांगले पॅकेज देऊ केले. त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. खूप प्रयत्न करुनही त्यांनी आधीच्या गुजरातच्या (Gujarat) निर्णयावर ठाम रहाण्याचे ठरवले. आता दोषारोपच करायचा असेल तर मग महाविकास आघाडीच्या काळात फॉक्सकॉनला चांगले पॅकेज का देण्यात आले नाही? असा सवाल उदय सामंत (Uday Samant) यांनी विचारला आहे.

 

दोन वर्षापासून या कंपन्या गुजरातशी वाटाघाटी करत असताना आधीच्या सरकारने त्यांचे मन का वळवले नाही? अडीच वर्षाच्या काळात कोणती मोठी गुंतवणूक आली? याची उत्तरे त्यांना द्यावी लागतील. प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख आहे. पण निराश असलो तरी खचलो नाही. आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करु आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षापेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला नश्चित नेऊ, असेही सामंत यांनी म्हटलं.

 

नाणारच्या गुंतवणुकीत खोडा घालू नका
परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. एकट्या महाराष्ट्रात भाजप-सेना युतीच्या सरकारच्या काळात यायची.
आता राज्यात पुन्हा तीच युती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा जयंत पाटील यांनी फार काळजी करण्याची गरज नाही.
आता वेदांची 1.58 लाख कोटींची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या मध्यमातून होणाऱ्या 3.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा घालू नका, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uday Samant | vedanta project went to gujarat industry minister uday samant reacts on aaditya thackeray allegations

 

हे देखील वाचा :

SBI SO Recruitment 2022 | स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरची भरती, ताबडतोब करा अप्लाय

Brahmastra Box Office Collection | ‘ब्रह्मास्त्र’ने केवळ 3 दिवसात मोडले 6 मोठे रेकॉर्ड; साऊथमध्ये सुद्धा जोरदार होतेय कमाई

Diet Tips For Uric Acid | सर्वात बेस्ट आहे ‘या’ पीठाची भाकरी, ताबडतोब कमी होईल यूरिक अ‍ॅसिड, सांधेदुखीसुद्धा होईल दूर

 

Related Posts