IMPIMP

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

by nagesh
Dasara Melava 2022 | ncps banner for shivsenas uddhav thackeray Dasra Melava 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Uddhav Thackeray | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) 39 आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि आघाडी सरकार कोसळलं. मोठ्या प्रमाणात आमदार शिंदेंसोबत गेल्याने शिवसेनेत गोंधळ उडाला आहे. दरम्यान, नगरसेवक तसेच स्थानिक कार्यकर्ते शिवसेनेतून जाऊ नयेत, यासाठी शिवसेना नेतृत्व मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

 

शिवसैनिकांनी शिवसेनेत एकनिष्ठ राहावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवबंधन बांधण्याची कल्पना पुढे आणली होती. आता मागील काही दिवसांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीनंतर शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांनी केलेलं बंड आणि त्यातून झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना सावध पावले उचलत आहे. शिवसेनेतील आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र घेण्याची कल्पना समोर आलीय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना लिहून द्यावं लागेल असं सांगण्यात आलंय.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, “आदरणीय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास असून,
त्यांना आपला बिनशर्त पाठिंबा आहे,” असा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांना लिहून द्यावं लागणार आहे.
त्याचबरोबर शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांसाठीही स्वाक्षरी मोहीम राबण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | after shiv bandhan shiv sainiks will now have to give a certificate of loyalty a big decision was taken after eknath shinde and others mla

 

हे देखील वाचा :

Shridhar Patankar Court Relief | उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे पाटणकरांना कोर्टाचा मोठा दिलासा

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Political Crisis | ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक धक्का; राज्यपालांना 12 उमेदवारांची नवी यादी पाठवणार

 

Related Posts