IMPIMP

UP Assembly Election Results | शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार ? UP च्या निकालावर संजय राऊत म्हणाले – ‘योगी आदित्यनाथ पुढे जाणारच होते, पण…’

by nagesh
UP Assembly Election Results | shivsena mp sanjay raut on yogi adityanath and sp akhilesh yadav up assembly election results 2022

सरकारसत्ता ऑनलाइन – उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election Results) भाजपने (BJP) मोठी आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर (UP Assembly Election Results) शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीमध्ये योगी पुढे जाणार हे नक्की होतं. पण अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची चांगली कामगिरी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अद्याप त्याठिकाणी मतमोजणी (Counting) सुरु आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल येतील. यानंतर बोलणे योग्य ठरेल. पण अखिलेश यादव भाजपला टक्कर देतील, एवढं नक्की असल्याचे राऊत यांनी म्हटले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

शिवसेनेची ही सुरुवात
गोवा (Goa Election Results) आणि उत्तर प्रदेशातही शिवसेनेने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. परंतु यापैकी एकाही उमेदवाराला यश मिळताना दिसत नाही. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, आमच्या लोकांनी मेहनत केली. ही शिवसेनेची सुरुवात होती. कोणताही पक्ष राज्याबाहेर जात असताना संघर्ष हा करावाच लागतो, असे राऊत म्हणाले.

 

शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार ?

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये (UP Assembly Election Results) शिवसेनेने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.
यावरुन भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट (Deposit) जप्त होणार अशी टीका केली होती.
ही टीका आता खरी होताना दिसत आहे. कारण शिवसेनेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही.
त्यामुळे आता निकाल समोर आल्यावर शिवसेनेच्या किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, हे पहावे लागले.

 

Web Title :- UP Assembly Election Results | shivsena mp sanjay raut on yogi adityanath and sp akhilesh yadav up assembly election results 2022

 

हे देखील वाचा :

Goa Election Results | गोव्यात राष्ट्रवादी, शिवसेनेचा धुव्वा ! नोटापेक्षा कमी मते मिळाली, जाणून घ्या आकडेवारी

Goa Election Results | पणजीतून उत्पल पर्रिकर पराभूत, BJP च्या बाबूश मोन्सेरात यांनी मारली बाजी

Joint Pain In Youngsters | सांधेदुखीने ग्रस्त होत आहेत तरूण, येथे जाणून घ्या कारणे आणि बचावाची पद्धत

 

Related Posts