IMPIMP

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांना कोरोनाचा संसर्ग

by pranjalishirish
uttarakhand cm tirath singh rawat tweets he has tested positive covid 19

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक होत असून, रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेकांना याचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत Tirath Singh Rawat यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. सध्या त्यांनी स्वत:ला आयसोलेट केल्याचे सांगितले.

रावत Tirath Singh Rawat यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले, की ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक आहे आणि मला कोणताही त्रास होत नाही. डॉक्टरांच्या देखरेखखाली मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. तुमच्यापैकी जे लोक काही दिवसांपूर्वी माझ्या संपर्कात आले असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगा. तुम्हीही कोरोना टेस्ट करावी’.

‘मुख्‍यमंत्री उध्दव ठाकरे आता तरी प्रायश्चित्त करणार का?

तिरथ सिंह हे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसत आहेत. ते कुंभमेळ्यातही हजर राहिले होते. पूजेच्या कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली होती. याशिवाय आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते, अशीही माहिती दिली जात आहे.

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

सतत वादग्रस्त विधान करून चर्चेत

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार मिळाल्यापासून रावत Tirath Singh Rawat हे सतत काहीना काही वक्तव्यावरून चर्चेत आहेत. यापूर्वी त्यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले होते. त्यावर बोलताना त्यांनी संस्काराची भाषाही केली होती. त्यानंतर मोठा वादंगही झाला होता.

Also Read : 

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

‘अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली’, परमबीर सिंग यांच्या ‘त्या’ 100 कोटींच्या लेटरमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे, सत्य सर्वांसमोर येईल

Sudhir Mungantiwar : ‘मुंबई पोलिसांना आता खंडणी यार्ड म्हटलं जाईल’

…म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना कोरोना होत नाही, भाजप आमदाराचे अजब विधान

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

Related Posts