IMPIMP

Mumbai Crime | वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील फिल्म बनवणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   एका मॉडेलची अश्लील फिल्म (Mumbai Crime) बनवून ती समाज माध्यमे आणि संकेतस्थळावर प्रसारित केल्याचा प्रकार अंधेरीच्या चारकोप भागात घडला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांवर चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी महिलेला यापूर्वीदेखील पॉर्न रॅकेटवरून (Mumbai Crime) अटक करण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यास्मीन खान, अनिरुद्ध प्रशाद जांगड, अमित पासवान आणि आदित्य अशी चारही आरोपींची नावे आहेत. यातील जांगड सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, अन्य आरोपी फरार आहेत. तक्रारदार महिलेने विविध ब्रँडच्या कपड्यांसाठी जाहिराती केल्या आहेत. अधिक काम मिळण्याच्या आशेने तिने तिचा मोबाइल क्रमांक इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर टाकला होता. मॉडेलच्या माहितीनुसार, राहुल ठाकूर नावाच्या व्यक्तीने सप्टेंबर महिन्यात तिच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला होता. त्यानंतर त्याने तिला केरशॉ नावाच्या व्यक्तीशी बोलायला सांगितले. त्याने तिला राहुल पांडे याच्याकडे पाठविले.

 

पांडेने आम्हाला वेब सीरिजसाठी बोल्ड सीन करणाऱ्या अभिनेत्रीची गरज असल्याचे सांगितले. मात्र, ही सीरिज भारतात प्रदर्शित होणार असल्याने तक्रारदाराने नकार दिला. त्यानंतर पांडे याने पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यात तक्रारदार मॉडेलकडे प्रस्ताव दिला आणि यावेळी आम्ही ही सीरिज भारतात प्रदर्शित करणार नसल्याचे सांगितले. तसेच तक्रारदार महिलेला यासाठी 50 हजार रुपये मानधन देण्याचेदेखील निश्चित झाले. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी तक्रारदार मॉडेल मलाड रेल्वे स्थानकात जांगड याला भेटली. त्याने तिला भाबरेकरनगर येथील एका इमारतीच्या 11 व्या मजल्यावर नेले. तिला त्या ठिकाणी मेकअप आर्टिस्ट यास्मीन खान आणि इतर दोन पुरुष भेटले. यास्मीन सीन शूट करत होती. तिने तक्रारदार महिलेला नग्न होण्यास सांगितले. ज्यावेळी तक्रारदार मॉडेलने नकार दिला आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा यास्मीनने तिला तिच्या विरोधात 15 लाखांचा मानहानीचा खटला भरण्याची धमकी दिली. भीतीपोटी तिने तो सीन शूट केल्याचे पोलिसांना सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शूटनंतर तिला फक्त 10 हजार रुपये मानधन मिळाले होते.
26 नोव्हेंबर रोजी एका ओळखीच्या व्यक्तीने मॉडेलला तिचा व्हिडिओ पॉर्न साइटवर असल्याचे सांगितले.
तसेच तो व्हिडिओ तिच्या नातेवाईक आणि समाज माध्यमांवरील ग्रुपमध्येदेखील प्रसारित केला जात आहे, असे सांगितले.
यावर तिने यास्मीनला व्हिडिओबद्दल विचारले असता, तिने अनभिज्ञ असल्याचे सांगितले.
त्यानंतर तिने तिला तो व्हिडिओ साइटवरून हटविण्यासाठी सांगितले, पण तिने तिचे फोन घेणे बंद केले.
त्यानंतर मॉडेलने धाव घेत चारकोप पोलिसांना तक्रार दिली आहे.

 

Web Title :- Mumbai Crime | police complaint filed against woman three others for shooting obscene videos in mumbai

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Thane ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts