IMPIMP

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

by nagesh
Chandrasekhar Bawankule | chandrashekhar bawankule warning to anil deshmukh over bjp party joining offer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी नवीन राजकीय रणनीती आखली जात आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंकडून वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करण्यासाठी चर्चा सुरू होती. त्यानंतर शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याविषयी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar Bawankule) यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल विचारले असता चंद्रशेकर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी “प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का?” असा प्रश्न केला. ते सोमवारी (५ डिसेंबर) पत्रकारांशी बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बावनकुळे म्हणाले, “प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मते आहेत का? प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्यांची मते त्यांच्याकडे घेतली आहेत का? परवा मी नंदूरबारच्या आदिवासी भागामध्ये होतो. तेथील ७५ हजार आदिवासी कुटुंबांनी पंतप्रधान मोदींना धन्यवाद करणारे पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र का लिहिले? आदिवासी समाजातील एका महिलेला राष्ट्रपती केले म्हणून त्यांनी मोदींचे आभार मानले आहेत.” वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर गेली म्हणजे सर्व मागासवर्गीय मते शिवसेनेला जातील, असे होणार नाही. (Chandrashekhar Bawankule)

 

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे त्यांना मागासवर्गाची मते भाजपला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “आदिवासी समाज कोणाची जहागिरी आहे का? तो एक समाज आहे आणि समाज म्हणूनच स्वतंत्र निर्णय करत असतो. तो कोणत्या नेत्याच्या म्हणण्यानुसार निर्णय करत नाही. त्या समाजाला स्वतःचे हित कळते. मोदी आपले हित जोपासत आहेत, हे त्यांना कळते. अगदी मागासवर्गीय समाजालाही वाटते, की मोदी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर संविधानाचं रक्षण करत काम करताहेत. त्यामुळे मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही.”

 

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर त्यांनी हल्ला केला. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी पहिल्यापासून एकत्र असल्याचे ते म्हणाले. “ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच होते. आज फक्त दाखवण्यासाठी एकेमकांसोबत बसलेत. नाहीतर, आतून हे सर्व एकच आहेत. कोणतीही मतं कोणाची जहागिरी नाही. जेव्हा लोकांना वाटतं की, हा पक्ष आमच्या हिताचा आहे तेव्हा ते त्या पक्षाला मतं देतात. कोणी म्हणत असेल की मागासवर्गीय मतं माझ्याकडे गठ्ठा आहे आणि मी इकडे देणार, तिकडे देणार, तर मतदार आता कधीही कोणाच्या म्हणण्यावर इकडे तिकडे जात नाही,” अशी टीका त्यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानंतर शिवसेना वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा त्यांना जास्त फरक पडत नाही,
जो स्थानिक पातळीवर काम करतो जनता त्याला मत देते, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, “जो स्थानिक पातळीवर जनतेला मदत करतो, जनतेची कामं करतो त्यांच्यामागे लोकं उभे राहतात.
सध्या लोक शिंदे फडणवीस सरकारच्या मागे आहेत, मोदींच्या मागे लोक आहेत.
त्यामुळे यांच्या युतीने महाराष्ट्रात काहीही फरक पडत नाही.”

 

बावनकुळे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी
करायच्या होत्या त्या सर्व करून टाकल्या आहेत.
आता फक्त काँग्रेस पक्षाच्या घटनेची झेरॉक्स काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची घटना करावी.
एवढंच शिल्लक राहिलंय, बाकी सर्व झालंय.” त्यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule comment on prakash ambedkar uddhav thackeray shivsena faction alliance

 

हे देखील वाचा :

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या

Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts