IMPIMP

Vasant More | ‘राज ठाकरे जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील’ – वसंत मोरे

by nagesh
Vasant More | internal dispute in pune mns has come to the fore once again

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Vasant More | गुढीपाडव्याच्या दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोग्यांच्या भाषणावरुन पुण्यातील मनसे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी दर्शवली. त्यानंतर वसंत मोरे यांचं मनसे शहराध्यक्ष पद काढून घेऊन त्यांच्या जागी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर पुणे मनसे पक्षात मोठी खळबळ उडाली. तर, काल कोंढव्यात (Kondhwa) वसंत मोरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मुस्लीम कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात “राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद, वसंत मोरे जिंदाबाद..”अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यावेळी वसंत मोरे यांनी मुस्लीम बांधवांना जिंदाबाद किंवा मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचे आवाहन केले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यावेळी बोलताना वसंत मोरे (Vasant More) म्हणाले की, ”राज साहेब जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील,” असं विधान वसंत मोरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मुस्लीम बांधवांना जिंदाबाद किंवा मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचे आवाहन केले. ‘या घोषणा ऐकल्यावर माझ्या मनाला अत्यंत वेदना झाल्या आहेत.’ तसेच वसंत मोरेंनी कार्यकर्त्यांना समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा किंवा वागणूक टाळा,’ असं सांगितलं.

 

दरम्यान, पुणे मनसेचा प्रमुख चेहरा म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिले जाते. कोरोनाच्या महामारीमध्ये मोरे यांचे काम कौतुकास्पद ठरले होते. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अजूनपर्यंत राज ठाकरेंनी त्यांचा फोन घेतला नाही, दरम्यान, मेसेजला रिप्लायही केला नाही. मागील दोन दशकांपेक्षा राज ठाकरेंसोबत मी असूनही अशी वागणूक मला पक्षात मिळत आहे, असं म्हणत वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली.

 

वसंत मोरेंना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऑफर –
पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन काढून टाकल्यानंतर वसंत मोरे यांना दोन पक्षातून ऑफर आल्या आहेत.
राष्ट्रवादीकडून (NCP) पहिल्याच दिवशी ऑफर आल्यानंतर थेट शिवसेनेची (Shivsena) त्यांना ऑफर आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वसंत मोरे यांना विचारणा देखील केली आहे.
दरम्यान वसंत मोरे यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. मात्र त्यांनी मनसे सोबतच राहणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

 

 

Web Title :- Vasant More | vasant more zindabad raj thackeray murdabad ghoshna in pune what exactly more saying

 

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut on BJP | ‘त्यांना’ भाजपाचं पाठबळ – संजय राऊत

MLA Rohit Pawar | ‘सहकार निवडणूकीत भाजप असेल तर राष्ट्रवादीतील मतभेद मिटवण्याची जबाबदारी माझी’ – रोहित पवार

Jayant Patil on Udayanraje Bhosale | जयंत पाटलांचा जोरदार टोला; म्हणाले – ‘उदयनराजे संध्याकाळी कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासले पाहिजे’

 

Related Posts