IMPIMP

Sanjay Raut on BJP | ‘त्यांना’ भाजपाचं पाठबळ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut on BJP | bjp support to gunaratna sadavarte direct allegation of sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Sanjay Raut on BJP | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी संपकरी एसटी कामगारांनी (ST Workers) आंदोलन केले आहे. त्यावेळी कामगारांनी चप्पल, दगडफेक देखील केली. या घटनेचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटताना दिसत आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांतही आरोपांचे सत्र सुरूच आहे. दरम्यान या घटनेवरुन बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट भाजपवर (BJP) आरोप केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला आहे. ”कालचा जो प्रसंग होता, त्या प्रसंगामागे जे कारस्थान आहे, ते आंदोलन नव्हतं तो हल्ला होता. आंदोलनं आम्हीही करतो.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर, ”त्या हल्ल्याचं समर्थन या महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील लोकं करतायत हा दळभद्री पणाचा कळस आहे, अशा प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. तुमची बेअब्रु होतेय. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर. त्यांचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात संसदीय लोकशाही पद्धतीत, विकासात, शेती क्षेत्रात जे प्रचंड योगदान आहे. अशा नेत्यावर महाराष्ट्रातच आपल्या लोकांच्या घरावर तुम्ही हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल?” असं ते म्हणाले. (Sanjay Raut on BJP)

 

पुढे राऊत म्हणाले, ”आतासुद्धा भाजपाचा नवनिर्माण केलेला नेता सदावर्ते आहे, त्याला संपूर्ण पाठबळ भाजपचं आहे. तो कुठे राहतो, कुणाच्या घरात राहतो, त्याला आर्थिक पाठबळ कुणाचं आहे. त्याला फक्त महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठीच अर्थपुरवठा केला जातो. कालचा हल्ला हा त्याचाच एक भाग होता. आम्ही जो तपास करतो त्यातून हे सिद्ध झालं असल्याचा,” दावा त्यांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, ”आता जे आंदोलक आझाद मैदानातून हलवून रेल्वे स्थानकावर बसले आहेत.
त्यांच्याकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकिट कशी असू शकतात ? कोणती यंत्रणा हे काम करतेय ? कोणता राजकीय त्यांना पोसतोय ?” असा सवाल राऊत यांनी केला.
तर, ”कामगारांच्या आंदोलनाविषयी आम्हाला सहानभूती आहे.
शिवसेनेने कायम कामगारांची पाठराखण केलेली आहे. कामगारांच्या श्रमातून शिवसेना निर्माण झालेली आहे.
पण कामगारांचा एक गट ज्या पद्धतीने भडकावून महाराष्ट्राविरुद्ध, मुख्यमंत्र्यांविरुद्ध, शरद पवारांविरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न सुरुय,” असा आरोप राऊत यांनी केला.

 

Web Title :-  Sanjay Raut on BJP | bjp support to gunaratna sadavarte direct allegation of sanjay raut

 

हे देखील वाचा :

MLA Rohit Pawar | ‘सहकार निवडणूकीत भाजप असेल तर राष्ट्रवादीतील मतभेद मिटवण्याची जबाबदारी माझी’ – रोहित पवार

Jayant Patil on Udayanraje Bhosale | जयंत पाटलांचा जोरदार टोला; म्हणाले – ‘उदयनराजे संध्याकाळी कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासले पाहिजे’

Best Multibagger Stock | एक वर्षात चारपट झाले पैसे, ‘या’ ट्रॅव्हल कंपनीच्या स्टॉकची कमाल

 

Related Posts