IMPIMP

MLA Rohit Pawar | ‘सहकार निवडणूकीत भाजप असेल तर राष्ट्रवादीतील मतभेद मिटवण्याची जबाबदारी माझी’ – रोहित पवार

by nagesh
Rohit Pawar | dispute between eknath shinde and devendra fadnavis says ncp mla rohit pawar

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Rohit Pawar | श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीमुळे (Shri Vitthal Sahakari
Sugar Factory Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंढरपूर (Pandharpur) येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी या निवडणूकीवर भाष्य केले. जर निवडणूकीत समोर भाजप (BJP)
असेल तर राष्ट्रवादीतील (NCP) मतभेद मिटवण्याची जबाबदारी माझी असून आपल्या विचाराचे पॅनल कसे उभे राहिल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस कल्याणराव काळे (Kalyanrao Kale), भगीरथ भालके (Bhagirath Bhalke), सुधीर भोसले (Sudhir Bhosale), विजय काळे (Vijay Kale) उपस्थित होते. रोहित पवार (MLA Rohit Pawar) म्हणाले, ”या ठिकाणी वेगवेगळ्या गटांना एकत्रित करून राष्ट्रवादी म्हणून लढण्यासाठी ज्या – ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या सर्व करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतरच पुढे कसे जाता येईल याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सोसायटी, सहकारी संस्था, ग्रामपंचायतीमध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने कधी कधी अनेक पॅनलमध्ये आपलीच लोकं असतात. श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणूकीत पॅनल कशा पद्धतीने होता. कोण कोण इच्छुक आहेत हे पहावे लागणार आहे. मात्र, जर पुढचे पॅनल भाजपचे असेल तर राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद मिटवून आपल्या विचाराचे पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे,” त्यांनी सांगितले.

 

..तर कारखाना चालू शकणार नाही
”कारखाना हातात घेण्यासाठी राजकारण डोक्यात घेऊन निवडणूक लढली तर कारखान्या ताब्यात येऊ शकतो.
परंतु, कारखाना चालू शकेल की नाही हे सांगता येणार नाही.
त्यामुळे कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल हे पहावे लागेल. कारखाना नीट चालवण्याची गरज असल्याचे सांगत कारखान्याला ताकद देण्याची गरज आहे. आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांची वास्तू असून त्याचा चांगला इतिहास आहे. त्यामुळे कारखाना पुढे कसा चांगला चालवता येईल हे पाहण्याची गरज असल्याचेही,” आमदार पवार यांनी सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- MLA Rohit pawar | elections of societies rohit pawar said i have the responsibility to reduce differences

 

हे देखील वाचा :

Jayant Patil on Udayanraje Bhosale | जयंत पाटलांचा जोरदार टोला; म्हणाले – ‘उदयनराजे संध्याकाळी कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासले पाहिजे’

Best Multibagger Stock | एक वर्षात चारपट झाले पैसे, ‘या’ ट्रॅव्हल कंपनीच्या स्टॉकची कमाल

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज, व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Related Posts