IMPIMP

Vikram Gokhale | विक्रम गोखले व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाकडून माहिती

by nagesh
Vikram Gokhale | vikram gokhale health update given by family friend rajesh damle

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती दिनानाथ रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. काल रात्री विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या मुलीने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाईफ सपोर्टवर आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा. तर गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यावस्थ आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे शरीर उपचारांना म्हणावे तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

 

 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माध्यमांना सांगितले,
डॉक्टर्स आणि विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांमध्ये सकाळी 10 वाजता चर्चा झाली.
विक्रम गोखले हे गंभीर असून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त ही अफवा आहे.
उद्या सकाळी 11 वाजता मेडिकल बुलेटिन येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vikram Gokhale | vikram gokhale health update given by family friend rajesh damle

 

हे देखील वाचा :

Pankaj Tripathi | ‘या’ कारणामुळे पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?

Taapsee Pannu | तापसी पन्नूचा आगामी चित्रपट होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

 

Related Posts