IMPIMP

Weight Control | ‘बेली फॅट’ कमी करायचे असेल तर ‘या’ 5 ‘सुपरफूड’चा करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

by nagesh
Weight Control | best foods that can control visceral fat know the best tips to control weight

सरकारसत्ता ऑनलाइन – Weight Control | वाढता लठ्ठपणा (Obesity) ही सर्वात मोठी समस्या आहे. शरीरात 5 वेगवेगळ्या प्रकारची चरबी असते. मांड्या, नितंब, मानेच्या मागच्या बाजूला आणि छातीभोवतीची चरबी सर्वात धोकादायक आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूल (Harvard Medical School) च्या तज्ज्ञांच्या मते, पोटातील चरबी (Belly Fat) ही सर्वात धोकादायक चरबी मानली जाते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल (Cholesterol), कर्करोग (Cancer), हृदयविकार (Heart Disease) आणि टाइप-2 मधुमेह (Type-2 Diabetes) यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढू शकतो (Weight Control).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या चरबीचा इन्सुलिन (Insulin), रक्तदाब (Blood Pressure) आणि रक्ताच्या गुठळ्यांबाबत पेशींच्या संवेदनशीलतेवर हानिकारक प्रभाव पडतो असे मानले जाते.

 

ही चरबी (Fat) सर्वात हट्टी चरबी आहे, ज्यापासून मुक्त होणे फार कठीण आहे. पोटाची अतिरिक्त चरबी आरोग्याला हानी पोहोचवू शकते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होईल. पोटाची चरबी कशी कमी करायची (Weight Control) ते जाणून घेऊया.

 

1. ग्रीन टी (Green Tea) चे सेवन करा :
ग्रीन टी प्यायल्याने पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. त्यात अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि कॅफीन (Caffeine) असतात, जे चयापचय वाढवतात आणि लवकर वजन नियंत्रणात आणण्यास मदत करतात. ग्रीन टी भूक कमी करते. दररोज तीन कप ग्रीन टीचे सेवन शरीराला आवश्यक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स पुरवण्यासाठी पुरेसे आहे.

 

2. एवोकॅडो (Avocado) चे सेवन करा :
कॅलरी (Calories) आणि चरबीने समृद्ध असण्याव्यतिरिक्त, एवोकॅडोमध्ये विरघळणारे फायबर देखील असते जे भूक कमी करण्यास मदत करते आणि आपल्याला दीर्घकाळ भूक न लागण्यास मदत करते. महिलांच्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एवोकॅडो खूप प्रभावी असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3. हळदी (Turmeric) चे सेवन करा :
हळद हा एक मसाला आहे जो सामान्यतः भारतीय घरांमध्ये आढळतो आणि दररोज विविध स्वरूपात वापरला जातो. हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन (Curcumin) हे अँटिऑक्सिडेंट आहे जे लिव्हरमधील (Liver) विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

 

याचे सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते आणि लिव्हरची कार्य क्षमता देखील वाढते. हळदीचा वापर विविध खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. याशिवाय दुधासोबत हळद सेवन केली जाते.

 

ओव्याचे (Celery) सेवन करा :
ओवा अनेक प्रकारच्या उपचारांमध्ये वापरला जातो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
याचे सेवन केल्याने अन्नाचे पचन (Digestion) आणि शोषण होण्यास मदत होते.
यामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते जे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे.
पराठे आणि चपातीत ओवा सेवन केल्याने त्याची चव वाढते आणि आरोग्याला फायदा होतो.

 

लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी (Control Obesity) लक्षात ठेवा या गोष्टी

लठ्ठपणावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सकाळी वेळेवर नाश्ता करा. नाश्ता टाळल्याने लठ्ठपणा येतो.

जेवण वेळेवर खा. वेळेवर खाल्ल्याने कॅलरीज जलद बर्न होतात.

आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन करा.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चाला आणि व्यायाम करा.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Control | best foods that can control visceral fat know the best tips to control weight

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जागेच्या वादातून वारज्यातील दत्तनगरमध्ये ‘राडा’ ! कोयत्याने वार करुन वाहनांची केली तोडफोड

Tulsi Water Benefits | वजन कमी करण्यासाठी तुळस सुद्धा अजमावून पहा, असा करावा लागेल वापर

Supriya Sule | संजय राऊत यांच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत सुप्रिया सुळेंचं पुण्यात मोठं विधान, म्हणाल्या… (व्हिडीओ)

 

Related Posts