IMPIMP

Supriya Sule | संजय राऊत यांच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत सुप्रिया सुळेंचं पुण्यात मोठं विधान, म्हणाल्या… (व्हिडीओ)

by nagesh
Supriya Sule | With the release of Sanjay Raut, our faith in justice remained unshaken

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनकेंद्रीय तपास यंत्रणांकडून (Central Investigation Agency) देशभरात ठराविक राजकीय पक्षांच्या नेत्यांविरोधात होत असलेली कारवाई, भाजपच्या (BJP) नेत्यांकडून होत असलेले आरोप (Allegation) या सगळ्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) हे आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार (NCP MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज पुण्यात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा (Press Conference) उल्लेख केला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, तीन वाजेपर्यंत आम्हाला जी काही प्रसिद्धी द्यायची ती द्या, त्यानंतर सिक्सर आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांना या पत्रकार परिषदेबाबत अधिक माहिती असावी म्हणून पत्रकारांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी अधिक बोलणं टाळल.

 

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा नेमका विषय काय आहे मला माहित नाही. पण राज्य नव्हे, देशही या पत्रकार परिषदेकडं अपेक्षेनं बघतोय. ते काय बोलतायत त्यांची आपण सगळे वाट बघूया. राऊत यांनी इशारा दिला आहे म्हणजे काहीतरी राज्याच्या हिताचंच असेल, आणखी दोन तीन तासांत कळेलच. मी पण पत्रकार परिषद बघणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

 

 

 

भाजपचे माजी खासदार (Former BJP MP) रोजच्या रोज राज्य सरकारमधील नेते व मंत्र्यांवर आरोप करत आहेत.
यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात (Politics) असं कधीच झालं नाही.
रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणं हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला हे साजेसं नाही.
घोटाळे (Scams) झाले आहेत असा कुणाचा आरोप असेल तर त्यांनी कोर्टात जायला पाहिजे.
परंतु उठसूट आरोप करणं हे टीव्ही सीरियलच्या जाहिरातीसारखं झाल्याचा टोला त्यांनी लगावला.

 

Web Title :- Supriya Sule | ncp leader and mp supriya sule comment on shiv sena mp sanjay raut press conference today

 

हे देखील वाचा :

Diabetes Control | ब्लड शुगर कंट्रोल करण्यात लाभदायक आहे दालचीनी, ‘या’ पध्दतीनं करा सेवन, जाणून घ्या

Multibagger Penny Stock | वर्षभरात 1 लाख रुपयांची गुंतवणूक झाली 25 लाख, ‘या’ पेनी स्टॉकने दिला बंपर रिटर्न

PM Kisan KYC | शेतकर्‍यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 11व्या हप्त्याबाबत आली नवीन माहिती, जाणून घ्या कुणाला होणार फायदा

Nashik Crime | नाशिकमध्ये मध्यरात्री सामाजिक कार्यकर्ते आणि ‘आरपीआय’चे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार

 

Related Posts