IMPIMP

Winter Session 2022 | ‘विरोधकांकडून फक्त शिंदे गटातील मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे’, अजित पवारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar comment on anjali damania claim about going with bjp

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) सध्या नागपुरात सुरू असून भ्रष्टाचाराच्या मुद्यावर विरोधी
पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या मंत्र्यांना काल चांगलेच घेरल्याचे पहायला मिळाले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी गायरान जमीन घोटाळ्यात चांगलेच
कात्रीत पकडले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. सोमवारी या प्रकरणी दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि विरोधकांनी
दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले. त्याबाबत माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे आणखी काही मंत्र्यांची नावे
असून ती ही वेळ आली की लवकर जाहीर करू. संजय राऊतांनी देखील मंत्र्यांच्या नावाचे हे बॉम्ब लवकरच फोडले जातील असे सुतोवाच पत्रकारांशी
बोलताना केले होते. मात्र त्यांच्या या भूमिकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार थोडीशी विरोधाभासी भूमिका स्विकारताना दिसत आहेत. (Winter Session 2022)

 

आजच्या कामकाजाच्या (Winter Session 2022) पार्श्वभूमीवर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला देत याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, विरोधकांकडून फक्त शिंदे गटातील मंत्र्यांनाच टार्गेट केले जात आहे. असं चित्र रंगवू नका. विरोधी पक्ष काम करत असताना दुजाभाव करून चालत नाही. एकाला एक आणि दुसऱ्याला एक अशी वागणूक द्यायची हे आम्हाला पटत नाही. असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांवर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. माझ्याकडे तीन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आली आहे पण विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका मांडत असताना ठोस पुरावे लागतात. तेव्हा या संदर्भात पुरावे येताच सर्वांपुढे मांडता येतील.

 

बॉम्बस्फोट होईल असे म्हणणाऱ्यांचा विचार तो केव्हा होईल. मी असे काही बोललोच नव्हतो असे म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांना चांगलाच टोला लगावला. तसेच सीमाभाग केंद्रशासित झाल्यास त्यातून नवे वाद निर्माण होतील. आणि आपली इच्छा असली तरी सर्वोच्च न्यायालयात या बाबतचे प्रकरण प्रलंबित असताना केंद्र सरकार याला मान्यता देणार का? असे म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सीमाभाग केंद्रशासित करा अशा मागणीला अजित पवारांनी घरचा आहेर दिला. (Winter Session 2022)

 

त्याबरोबरच अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, माझ्या मनात एक प्रश्न आहे. जतमधील आणि अक्कलकोटमधील
गावेही म्हणतायेत आम्हाला कर्नाटकात जायचं आहे. मग ते ही त्यात टाका असं जर म्हटल तर त्यातून नवीन प्रश्न
निर्माण होणार आहेत.

 

दरम्यान सीमाप्रश्नावर आज विधीमंडळात (Winter Session 2022) प्रस्ताव येणार असून त्याला विरोधी
पक्षाचे समर्थन असणार आहे. तसेच काही सूचना करावयाच्या असल्यास त्या देखील केल्या जातील.
सोबतच आमचा विरोधकांचा प्रस्ताव आहे. तो विदर्भाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
त्यावर देखील चर्चा होणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना सांगितले.

 

Web Title :- Winter Session 2022 | ajit pawar reaction on uddhav thackeray statement over maharashtra karnataka border dispute union territory status

 

हे देखील वाचा :

Maharashtra Revenue Department | पुण्यासह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यामध्ये बेकायदा दस्तनोंदणी, गैरव्यवहार ! दोषी प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई होणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Lalit Prabhakar | अभिनेता ललित प्रभाकरचा आगामी चित्रपट ‘टर्री’चा पोस्ट आउट; लिलतच्या रांगड्या लुकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

Jalna ACB Trap | 80 हजाराची लाच घेताना उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

 

Related Posts