IMPIMP

Narayan Rane | तेंव्हाच तक्रार का केली नाही? नारायण राणेंच्या आरोपांचे छोटा राजनच्या नातेवाईकांकडून खंडन

by nagesh
Narayan Rane | chhota rajan brother hemanchand more clarification on narayan rane alligation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी, उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी शकील (Shakeel), छोटा राजन (Chhota Rajan) यांना सुपारी दिली होती, असा आरोप केला होता. यानंतर आता छोटा राजनचा मामेभाऊ हेमचंद्र मोरे (Hemchandra More) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्या आरोपांचे खंडन करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी छोटा राजनबाबत केलेल्या वक्तव्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी केलेले विधान पडताळून पाहणे गरजेचे आहे. जर असे कृत्य झाले असते, तर नारायण राणे यांनी तेव्हाच अशी तक्रार (Complaint) दाखल केली असती. मात्र अशी कोणतीही तक्रार दाखल केली नाही, असे हेमचंद्र मोरे यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच छोटा राजनवर जे आरोप आहेत. त्याचे खटले सध्या न्यायालयात सुरू आहेत. असे असताना राजकीय पुढाऱ्यांनी छोटा राजन यांच्या नावाचा वापर करुन एकमेकांना लक्ष करण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंतीही मोरे यांनी राजकीय नेत्यांना केली आहे.

 

 

काय म्हणाले होते नारायण राणे?

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती. काय झालं मारलं का कोणी? मी जिवंत आहे.
मी तुम्हाला पुरुन उरेन. आता तुम्ही एकनाथ शिंदेवर (CM Eknath Shinde) बोलताय, काय तर म्हणे पदं दिली.
उपकार नाही केले. ही शिवसेना वाढवली कोणी, टिकवली कोणी, सत्तेपर्यंत आणली कोणी? केवळ शिवसैनिकांनीच, असा आरोप राणे यांनी केला.

 

 

Web Title :- Narayan Rane | chhota rajan brother hemanchand more clarification on narayan rane alligation

 

हे देखील वाचा :

MS Dhoni | “तुझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य गिफ्ट कोणतं?”, धोनीच्या उत्तराने ॲंकरची झाली बोलती बंद

National Games 2022 | महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत मिळाले सुवर्णपदक

Shivsena | ‘उद्धव काकांनी संधी दिली तर राजकारणात येईन’, बाळासाहेबांचा आणखी एक नातू राजकारणात येण्याच्या तयारीत

 

Related Posts