IMPIMP

Mahabaleshwar News : जंगली गव्यांना रोज पाव खायला देणं ‘त्या’ नागरिकाला महागात पडलं

by pranjalishirish
mahabaleshwar-man-was-feeding-bread-to-wild-animal-gava-got-notice-issued-by-the-forest-department-sas

सरकारसत्ता ऑनलाइन – एक नागरिक जंगली गव्यांना पाव खायला घालत होता, असा एक व्हिडिओ सोशलवर खूप व्हायरल झाला होता. महाबळेश्वरमधील Mahabaleshwar हा व्हिडिओ होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता वन विभागानं याची दखल घेतली आहे. विभागानं संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे. वन्यजीव अभ्यासकांनी हा प्रकार चुकीचा असल्याचं सांगत तो तातडीनं थांबवावं, असं मत व्यक्त केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

इब्राहिम महंमद पटेल (रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) यांच्या नावे महाबळेश्वरजवळ Mahabaleshwar शेत आणि हॉटेल आहे. त्यांच्या शेतात गेल्या काही महिन्यांपासून सायंकाळच्या वेळी गवे चरण्यासाठी येत होते. प्राण्यांवर दया दाखवत पटेल यांनी या गव्यांना पाव खायला देण्यास सुरुवात केली. नंतर नंतर हा रोजचा उपक्रम झाला. दोघांची भीती संपली आणि नंतर पटेल हे हातांनी गव्यांना पाव भरवू लागले.

नंतर पटेल यांचा एक व्हिडिओ समोर आला जो सोशलवर व्हायरल झाला. यानंतर सोशलवर विविध चर्चा सुरू झाल्या. यावर लोकांच्या विविध प्रक्रिया समोर आल्या. वन विभागानं याची दखल घेत पटेल यांना नोटीस बजावली आणि जबाब नोंदवला. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवणं हे नियमबाह्य आहे. पटेल यांचा हेतू लक्षात घेता वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली. महाबळेश्वरचे Mahabaleshwar वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी याबाबत माहिती दिली.

प्राणीप्रेमींनीही यावर भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, वन्यजीवांना खाद्य भरवणं ही अनैसर्गिक कृती आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवल्यानं त्यांना त्याची सवय लागते. हे पदार्थ मिळत नाहीत तेव्हा ते माणसांवर हल्ले करतात आणि हातातून ते हिसकावण्याचा प्रयत्न करतात. यातून माणसाला किंवा वन्यजीवाला धोका पोहोचू शकतो. निसर्ग हा प्रत्येक प्राण्याची काळजी घेतच असतो. त्यामुळं वन्यजीवांना मानवी खाद्य भरवण्याची गरज नसते. मोर, माकड, कबुतरं अशा प्राण्यांना बाह्यखाद्य देऊ नये. वन्यजीवांना विविध आजारही असू शकतात. ते आजार माणसात येऊ शकतात, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात च

Related Posts