IMPIMP

मनसुख हिरेन प्रकरणात नाव आलेले सचिन वाझेंचे शिवसेना ‘कनेक्शन’; जाणून घ्या एन्काऊंटर स्पेशालिस्टबद्दल

by amol
bjp leader sanjay kute slams thackeray govt over sachin vaze issue

मुंबई : Sachin Waze उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्यानंतर काही दिवसांतच गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला. मात्र, याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे  यांचे नाव पुढे आले आहे. याच प्रकरणावर राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खुनाचा आरोप केला आहे. पण आता सचिन वाझे यांचे राजकीय कनेक्शन असल्याची माहिती दिली जात आहे.

सचिन वाझे Sachin Waze हे पोलीस सेवेत असताना 2002 मध्ये झालेल्या घाटकोपर स्फोटप्रकरणी आरोपी ख्वाजा युनूसचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. मात्र, 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. सचिन वाझे Sachin Waze यांना पुन्हा 2020 मध्ये पोलीस सेवेत घेण्यात आले. सचिन वाझे हे सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या ‘क्राइम इंटेलिजन्स युनिट’चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत.

आत्तापर्यंत 60 पेक्षा जास्त एन्काउंटर

ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये सचिन वाझे यांचा समावेश होता. सचिन वाझे यांनी पोलीस सेवेत असताना आतापर्यंत 60 पेक्षा जास्त एन्काउंटर केले आहेत. ते मुन्ना नेपाळीच्या एन्काउंटरमुळे चर्चेत आले होते.

2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश

सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन झाले होते. त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला. मात्र, तत्कालीन सरकारने सचिन वाझे यांचा राजीनामा मंजूर केला नाही. 2008 मध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

अन्वय नाईक प्रकरणाचा तपास

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यादरम्यान सचिन वाझे हे मुंबई पोलिसांकडून नेतृत्व करत होते. सध्या ते रिपब्लिक टीव्हीच्या कथित टीआरपी घोटाळ्याची चौकशीही करत आहेत.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts