IMPIMP

खा. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची SIT मार्फत चौकशी होणार, सुसाइड नोटमध्ये गुजरातच्या माजी गृहमंत्र्याचं नाव

by pranjalishirish
sit-probe-mp-mohan-delkars-suicide-name-former-home-minister-gujarat-suicide-note

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या आत्महत्येची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे. विधानसभेत ते बोलत होते. 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदारानं तणावातून आत्महत्या केल्याचं सुसाइड नोटमधून स्पष्ट होत आहे. दादरा-नगर हवेली प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल (Praful Khoda Patel) यांनी मला राजकीय जीवनातून उडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. त्यामुळं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाणार आहे. सुसाइड नोटमध्ये पटेल यांच्याशिवाय अनेक नेत्यांची नावं नमूद आहेत, असंही देशमुखांनी सांगितलं.

अनिल देशमुख म्हणाले, दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खाेडा पटेल हे अगोदर गुजरातचे गृहमंत्री देखील होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात न्याय मिळतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र शासन यांच्यावर माझा विश्वास आहे, असं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. प्रफुल्ल खाेडा पटेल आणि काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला त्रास देण्यात येत होता. अडचणी येत होत्या आणि सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या, असे डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवलंय, अशी माहितीही देशमुखांनी दिली.

पुढं बोलताना देशमुख म्हणाले, मोहन डेलकर Mohan Delkar यांच्या मुलानं आणि पत्नीनं पत्रदेखील लिहिलं असून, त्यात त्यांनी प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यावर आरोप केले आहेत. माझे वडील हे प्रचंड दबावाखाली होते, असं त्यांच्या मुलानं म्हटलं असल्याचंही देशमुखांनी सांगितलं.

Also Read :

शिवसेना-राष्ट्रवादी’च्या भूमिकेवर नाना पटोले भडकले !

औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मिळाला ‘हा’ मोठा सन्मान, ‘आशिया पोस्ट फेम इंडिया’ कडून दखल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Maharashtra : ‘अमित शहा खुनी है’ च्या घोषणांनी सभागृहात राडा, सत्ताधारी आणि भाजप समोरासमोर, जाणून घ्या नेमकं काय घडलं

Related Posts